दीड वर्षीय चिमुकल्याला ३० सेकंदात ८ वेळा आपटलं, आरोपीला फाशीची शिक्षा; ४० दिवसात निकाल, काय घडलं होतं?
esakal July 11, 2026 01:45 AM

उत्तर प्रदेशात शिकोहाबादमध्ये एका मुलाच्या हत्येची धक्कादायक घटना घडली होती. ३० सेकंदात आरोपीनं चिमुकल्याला ८ वेळा जमिनीवर आपटलं होतं. या प्रकरणी आता ४० दिवसात कोर्टानं आरोपी विराज पाठकला फाशीची शिक्षा सुनावली आहे. चिमुकल्या आरवची हत्या अतिशय निर्घृणपणे करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात होता. Man Sentenced to Death for Killing 18-Month-Old Boy in UP

पोलिसांनी विराज पाठकला अटक केलीय. चिमुकल्या आरवच्या निर्घृण हत्येनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला. तर पोलिसांनी वेगानं तपास करत आरोपपत्र दाखल केलं. अवघ्या ४० दिवसात कोर्टानं या प्रकरणी सुनावणी करत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. पोलिसांनी फक्त ६ दिवसात चार्जशीट दाखल केली होती.

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांना शिवीगाळ, कागद भिरकावत वकिलाचे न्यायमूर्तींनाच आदेश; सुनावणीवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

आरोपीने दावा केला होता की, चिमुकल्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि ती ब्लॅकमेल करत होती. यातून झालेल्या वादानंतरच त्याची हत्या केली. तर आरवच्या आईने म्हटलं की, विराजला माझ्याशी लग्न करायचं होतं आणि चिमुकला आरव अडथळा असल्याचं विराजला वाटत होतं.

विराज आणि आरवची आई यांच्यात यावरून सतत वाद होत होते. आरव एकटाच घरी असताना त्याला चॉकलेटचं आमिष दाखवून विराजने सोबत नेलं. त्यानंतर चिमुकल्याला रस्त्यावर तब्बल ८ वेळा आपटलं. यात गंभीर जखमी झालेल्या आरवला रुग्णालयात नेलं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

बदायूत राहणाऱ्या विराजच्या तिन्ही भावांनी वडिलांच्या मृत्यूनंतर तो नैराश्यात होता असं सांगितलंय. शिक्षण अर्धवट राहिलं, गाडी चालवायचं काम केलं आणि त्यानंतर एक दुकानही सुरू केलं होतं. पण गेल्या काही महिन्यात त्याच्यात अमुलाग्र बदल झाला होता असंही भावांनी सांगितलं.

विराजने आरवच्या हत्येनंतर मोठा भाऊ राजीवला कॉल केला होता. फोनवर रडत रडत मला फसवलंय असं म्हणत होता. दरम्यान, विराजच्या कुटुंबियांनी घडलेली घटना चुकीची आणि भयंकर असल्याचं सांगितलंय. एका निरागस चिमुकल्यासोबत राक्षसी कृत्य करण्यात आलंय आणि याचं समर्थन करता येणार नाही असंही आरोपीच्या कुटुंबियांनी म्हटलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.