टीम इंडियामध्ये बदल, BCCI ने हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांची रिप्लेसमेंट केली जाहीर
Marathi July 12, 2026 07:25 PM

भारतीय पुरुष निवड समितीने भारताच्या आगामी मालिकेंच्या वनडे आणि टी २० संघात रविवारी (१२ जुलै) जाहीर केले. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी हर्षित राणाऐवजी प्रिन्स यादवची, तर झिम्बाब्वेविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीऐवजी रवी बिश्नोईची निवड करण्यात आली आहे.

वनडे मालिकेत राणाच्या जागी प्रिन्स
ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान राणाच्या उजव्या हॅमस्ट्रिंगमध्ये अचानक अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर केलेल्या स्कॅनमध्ये त्याला ग्रेड १ ची हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याचे निदान झाले. त्याला इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून वगळण्यात आले असून, पुढील तपासणी आणि उपचारांसाठी तो बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे दाखल होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांची वनडे मालिका येत्या १४ जुलैपासून सुरू होत आहे. नुकत्याच झालेल्या टी २० मालिकेत इंग्लंडने भारताचा ४-० असा पराभव केला. त्यामधील शेवटच्या सामन्यात भारताचा ५६ धावांनी पराभव झाला. यामध्ये प्रिन्सने ६० धावा दिल्या होत्या.

टी २० मालिकेत चक्रवर्तीच्या जागी बिश्नोई
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान चक्रवर्तीला त्याच्या डाव्या हॅमस्ट्रिंगमध्ये अचानक अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये ग्रेड २ हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याचे निदान झाले. तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार, त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. पुढील उपचारांसाठी तो बीसीसीआयच्या सीओईकडे हजर होईल.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांसाठी भारताचा सुधारित संघ – शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव.

झिम्बाब्वे टी 20 साठी भारताचा सुधारित संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकुर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रवी बिश्नोई.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.