ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
1. पती गितेश शारीरिक संबंध ठेवण्यास अक्षम होता, म्हणून माझ्यावर अघोरी उपाय केले, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला, माजी खासदार विनायक राऊतांची सून गिरीजाचे गंभीर आरोप, राऊतांविरोधात ठाण्यामध्ये जादुटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल https://tinyurl.com/32rcsth9 सात वर्षे छळलं, नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती https://tinyurl.com/4cba74wc
2. विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं, आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं https://tinyurl.com/2k9da5u4 विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला, गिरीजा राऊतांच्या आईची मागणी https://tinyurl.com/tvbndftj गिरीजाने वेगळं होण्यासाठी 12 कोटी रुपये, थ्री बीएचके फ्लॅट आणि महिन्याला पाच लाख रुपये मागितले, विनायक राऊतांचा प्रत्यारोप, पैशांसाठी सून खोटेनाटे आरोप करत असल्याचा दावा https://tinyurl.com/5xy4sxe6
3. खरे हिंदूद्रोही आणि देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4fzuvuc5
4. अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांसारख्या स्थानिकांच्या विरोधामुळंच भाजपात प्रवेश रखडल्याचा दावा https://tinyurl.com/mp6cka6w खडसेंची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन, मी तर छोटा माणूस आहे, मी काय कुणाचा प्रवेश थांबवणार? गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला https://tinyurl.com/3j9xxuvu
5. एफडीआयचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या भेसळखोरांवरील कारवाईचा धसका, मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल एक लाख लिटरने घटलं, सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात https://tinyurl.com/396wrx9u
6. आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट, राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला https://tinyurl.com/yvrewzzx
7. कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला, मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश https://tinyurl.com/ycxu4uds दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ https://tinyurl.com/mw9rjjmn
8. सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/dynf5kaz राम मंदिरातील देणगी गैरव्यवहार लज्जास्पद, बेळगावातील प्रांत प्रचारकांच्या बैठकीत संघाकडून दुःख व्यक्त https://www.youtube.com/watch?v=w13pbCvWgTg
9. अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्ध पेटलं, अमेरिकेचे इराणच्या 140 लष्करी ठिकाणांवर हल्ले, इराणचंही अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर, जॉर्डनमधील अमेरिकेचं कमांड युनिट उद्ध्वस्त https://tinyurl.com/563y6aba ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला, 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता https://tinyurl.com/mvmj9cxy
10. टी-20 संपली, आता वनडेचा थरार, IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, बुमराचेही पुनरागमन, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/42ksvh92 14 जुलै रोजी होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन https://tinyurl.com/4ccu49p2
एबीपी माझा स्पेशल
पंढरपुरात हजारो सायकलस्वारांची दिंडी, रिंगण करत हरिनामाचा जयघोष, पंढरी दुमदुमली https://tinyurl.com/4r87fdnj
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w