इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शतक करताच हिटमॅनच्या नावावर होतील 'हे' 3 मोठे रेकॉर्ड्स! वाचा सविस्तर
Marathi July 12, 2026 10:24 PM

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरूवात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेने झाली, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ ०-४ असा पराभूत झाला. या दु:खद आठवणी विसरून जा, कारण आता वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका भारताचा स्टार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मासाठी अविस्मरणीय ठरू शकते.

रोहितने या मालिकेत एक शतकी खेळी केली असता त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होणार आहे. ते कोणते, हे जाणून घेऊ.

रोहितचे एक शतक अन् अनेक विक्रम
सध्या रोहित, विराट कोहली आणि भारताच्या इतर खेळाडूंसोबत सरावामध्ये व्यस्त आहे. त्याने आगामी वनडे मालिकेत एक शतक केले, पहिले तर तो सर्वाधिक शतके करणारा भारतीय सलामीवीर बनेल. दुसरा विक्रम, वयाच्या ३९ व्या वर्षी शतकी खेळी करणारा पहिला भारतीय ठरेल. तिसरे, डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर इंग्लंडमध्ये १० शतके झळकावणारा दुसरा परदेशी फलंदाज ठरेल.

रोहितने तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत दोन शतके केली, तर तो इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा भारतीय खेळाडू ठरेल.

तसेच या मालिकेत रोहितला इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा आणि सर्वाधिक धावा करणारा भारतीय सलामीवीर बनण्याचीही संधी आहे. हा विक्रम करण्यासाठी त्याला मालिकेत एक षटकार मारून १७८ धावा कराव्या लागतील.

रोहितने जर या वनडे मालिकेत ८ षटकार मारले, तर तो इंग्लंडमध्ये वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा परदेशी फलंदाज ठरेल. त्याने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये ११७२० धावा केल्या आहेत. यावरून त्याला १२००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी २८० धावांची आवश्यकता आहे.

रोहितला SENA देशांविरुद्ध (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) ९००० धावा करणारा एकमेव आशियाई सलामीवीर’ बनण्यासाठी ६९ धावांची गरज आहे.

वनडे मालिकेचे वेळापत्रक
या वनडे मालिकेची सुरूवात १४ जुलैपासून होणार आहे. पहिला सामना बर्मिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे. दुसरा सामना १६ जुलैला कार्डिफ आणि तिसरा सामना १९ जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.