जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
कुलदीप माने, एबीपी माझा July 13, 2026 04:13 PM

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident सांगली: जेजुरी मधील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे. येतील तशी वाहने आणि दिंड्या सोडल्याने हा अपघात (Jejuri Accident news) घडला असल्याचेही ते म्हणाले. वारीत वाहने एका बाजूला आणि दिंडी एका बाजूला सुरू ठेवायला हवी होती, मात्र तसं झाल्याने हि दुर्दैवी घटना घडल्याचे विठ्ठल पाटील म्हणाले. (Ashadhi Vari 2026 Accident)

जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) ट्रकचा आज (13 जुलै) सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 7 ते 8 जण जखमी असल्याची माहिती आहे. (Jejuri Accident news) यावर बोलताना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा जेजुरी अपघात प्रकरणी आरोप गंभीर आरोप करत अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. पोलिसांनी वाहने एका बाजूला आणि दिंडी एका बाजूला सुरू ठेवायला हवी होती, हा नियम पोलिसांनी का ठेवला नाही? हा नियम किमान इथून पुढच्या प्रवासात तरी पाळला जावा, याची पोलिसांनी काळजी घेण्याचीही विनंती त्यांनी केली आहे.

Jejuri Accident News: अपघातात 7 वारकरी जखमी, तर 3 जण ठार आहेत

ज्ञानेश्वर माऊली पालखी दरम्यान पुरंदर तालुक्यातील बेलसर फाटा येथे राजवाडा लॉज समोर हा अपघात झाला. तर या अपघातात नंदा बाबुराव पवार, (वय 60 वर्षे, रा. कवलापूर ता. मिरज जि.सांगली.), माधवी राजाराम सलगरे, (वय 55 वर्षे, रा. मालगाव ता. मिरज जि. सांगली), राजश्री शंकर भोसले, (वय 55 वर्षे, रा. कसबे डिग्रज ता. मिरज जि. सांगली) यांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातातील जखमी जखमींवर आनंदी हॉस्पिटल जेजुरी येथे उपचार चालू आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे आहे.

▪️1) शांता शिवाप्पा अलकोपर, वय 70 वर्षे रा. मिरजवाडी ता. मिरज जि. सांगली

▪️2) कासाबाई जगन्नाथ गस्ते वय 70 वर्षे रा. आष्टा ता. वाळवा जि. सांगली

▪️3) लक्ष्मी विठ्ठल गडदे वय 45 वर्षे रा. नांगोळे ता. कवठेमहांकाळ जि. सांगली

▪️4) अक्काताई बबन कोळी वय 60 वर्षे रा. शिरगाव ता. तासगाव जि. सांगली

▪️5) शैलजा दिनकर जगताप वय 58 वर्षे रा.कवलापूर ता. मिरज जि. सांगली

▪️6) गिताबाई सदाशिव हंकारे वय 65 वर्षे रा. कसबेडिग्रस ता. मिरज जि. सांगली

▪️7) मंगल विलास पाटील वय 65 वर्षे रा. कवलापूर ता. मिरज जि. सांगली

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.