सध्याच्या काळात रिलेशनशिप किंवा लिव्ह-इन मध्ये राहणं खूप सामान्य झालं आहे, असं आपल्याला वाटतं. पण दुसरीकडे, एक नवीनच माहिती समोर आली आहे. माहितीनुसार एखाद्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये राहणं किंवा लिव्ह-इन पार्टनरशिपमध्यं राहण्यापेक्षा स्वतःच्या हक्काच्या घरात एकटं राहणं आणि स्वत:वर प्रेम करणं मुलींना जास्त सुरक्षित आणि आनंदाचं वाटत आहे. स्वतःचं स्वातंत्र्य, करिअर आणि मानसिक शांतता या गोष्टी मुलींसाठी नात्यांपेक्षा जास्त महत्त्वाच्या ठरत आहेत.
कारणं पुढीलप्रमाणे –
स्वातंत्र –
एकटं राहताना स्त्रिया कोणताही विचार न करता मनाला येईल ते करतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची परवानगी घेण्याची गरज पडत नाही. काही स्त्रियांच्या मते एकटं राहणं म्हणजे स्वातंत्र्य. त्या असं सांगतात की जेव्हा लग्न करतो तेव्हा हे स्वातंत्र हिरावून घेतलं जातं.
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी –
पूर्वीच्या काळी मुलींना काम करण्याची किंवा पैसे कमवण्याची परवानगी नव्हती. तथापि, आज मुली अधिक स्वतंत्र होत आहेत. त्या स्वतःची उपजीविका स्वतः कमावतात आणि घरखर्च सांभाळतात. इतकेच नाही, तर पैसे मागण्याऐवजी त्या आता स्वतःचे छंद जोपासत आहेत. यामुळे, त्यांना आता त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या कोणाची गरज वाटत नाही.
मतभेद नकोच
एकट्या राहण्यामागील सर्वात मोठ्या कारणांपैकी एक म्हणजे, जेव्हा त्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना नात्यांमध्ये पाहतात , तेव्हा त्यांना रोजच्या मतभेदांना आणि घटस्फोटांना सामोरे जावं लागतं. ही आव्हाने टाळण्यासाठी महिला एकटे राहण्याचा पर्याय निवडत आहेत.
हेही वाचा – नेहमी चिडचिड, थकवा आणि ओव्हरथिंकिंग? Millennialsमध्ये वाढतोय ‘सायलेंट स्ट्रेस’