INDW vs ENGW: भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये कसोटीत ऐतिहासिक विजय, लॉर्ड्सवर विजयी पताका फडकावली
GH News July 13, 2026 08:15 PM

भारत आणि इंग्लंड वुमन्स क्रिकेट यांच्यात एकमेव कसोटी सामना लॉर्ड्सवर मैदानात खेळवला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडला 270 धावांनी नमवलं आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. लॉर्ड्सवर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावापासून मजबूत पकड मिळवली होती. त्याचा निकाल दुसऱ्या डावातही दिसून आला. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने पहिल्या डावात 285 धावा केल्या. तसेच इंग्लंडला पहिल्या डावात 170 धावांवर रोखलं आणि 115 धावांची मजबूत आघाडी घेतली. या आघाडीसह दुसऱ्या डावात खेळताना भारातने 341 धावा केल्या. तीन विकेट हातात असताना भारताना डाव घोषित केला. यासह इंग्लंडसमोर विजयासाठी 456 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान काही इंग्लंडला गाठता आलं नाही. इंग्लंडचा संपूर्ण डाव 186 धावांवर आटोपला.

पहिल्या डावात काय घडलं?

भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना स्मृती मंधानाने चांगली फलंदाजी केली. तिने 108 चेंडूत 83 धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 121 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्माने 87 चेंडूत 57 धावा केल्या. या तिघांच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 287 धावांपर्यंत मजल मारली. तर इंग्लंडला पहिल्या डावात 170 धावांवर रोखण्यात गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली.भारताकडून क्रांती गौडने हिने इंग्लंडचा निम्मा संघ बाद केला. तिने 17 षटकात 7 निर्धाव षटकं टाकली आणि 37 धावा देत 5 गडी बाद केले. तर सायली सातघरेने 2, स्नेह राणाने 2 आणि दीप्ती शर्माने एक विकेट काढली.

दुसऱ्या डावात काय घडलं?

दुसऱ्या डावात भारताकडून सलामीला आलेल्या स्मृती मंधानाची बॅट पुन्हा तळपली. तिने 130 चेंडूत 70 धावा केल्या. त्यानंतर यास्तिका भाटियाने लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक शतक ठोकलं. तिने 158 चेंडूत 113 धावांची खेळी केली आणि बाद झाली. ऋचा घोषने 52 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. यासह भारताने 341 धावांवर 7 गडी गमवून डाव घोषित केला. भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव गडगडला. स्नेह राणा, सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीपुढे त्याचा निभाव लागला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.