मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वेने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील केवळ निर्धारित प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढण्याचे आणि उतरण्याचे आवाहन केले आहे. सिग्नल ट्रॅकजवळ रिकाम्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याच्या आणि त्यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी संबंधित ठिकाणी आरपीएफची तैनाती वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेने स्पष्ट इशारा दिला आहे की यार्ड, कारशेड, सिग्नल किंवा कोणत्याही अनधिकृत ठिकाणाहून ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करणे हा रेल्वे कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, दररोज सकाळी ८ ते ८:३० च्या दरम्यान, कळवा कारशेडहून सुटणारी एक रिकामी लोकल ट्रेन मुख्य प्रवेशद्वाराजवळील केबिनजवळ सिग्नलची वाट पाहत थांबते.
Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा खर्च ४०,००० कोटींनी वाढणार? जाणून घ्या नेमकं कारण काय...या वेळेत, काही प्रवासी अनधिकृत गेट ओलांडून थेट सिग्नलजवळ ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. जर ट्रेनला सिग्नल मिळाला आणि ती या वेळी पुढे जाऊ लागली, तर मोठा अपघात होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने संबंधित विभागांच्यासमन्वयाने हा अनधिकृत प्रवेश बिंदू कायमस्वरूपी केला आहे. याव्यतिरिक्त, रेल्वे अशा तांत्रिक आणि कार्यान्वयन उपायांचाही शोध घेत आहे, ज्यामुळे गाड्यांना सिग्नलवर थांबण्याची गरजच भासणार नाही.
Railway Ticket Booking: यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट बुकिंग! IRCTC संकेतस्थळाचा कायापालट, कधी होणार सुरू?मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे केवळ निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्मचाच वापर करण्याचे आणि कोणत्याही मदतीसाठी रेल्वे हेल्पलाइन १३९ किंवा कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी, त्या ठिकाणी रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) जवानांची तैनाती वाढवण्यात आली आहे. रेल्वेने स्पष्ट केले आहे की, कारशेड, यार्ड किंवा इतर प्रवासी नसलेल्या भागांमध्ये रिकाम्या रेकमध्ये चढणे अत्यंत धोकादायक आहे. रेल्वेच्या आवारात प्रवेश करून अनधिकृत ठिकाणांहून ट्रेनमध्ये चढणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.