कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाची गोड बातमी मिळू शकते. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय शोधाल. वडिलांसोबत एखाद्या किरकोळ कारणावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो कर्ज घेणं टाळा आणि ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – शेअर बाजाराशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. सासरच्या नात्यातील एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. प्रवासाचाही योग आहे. मात्र, अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देणं टाळा.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आईसोबत झालेला एखादा महत्त्वाचा संवाद तुमच्या अनेक समस्यांचं उत्तर ठरू शकतो. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती भविष्यात उपयोगी पडेल. घरी नातेवाईकांची ये-जा वाढेल आणि धार्मिक वातावरणही निर्माण होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अजिबात हलगर्जीपणा करू नये.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. आज इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणं टाळा. कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. नोकरीसंदर्भातील महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाचा योग आहे.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज कुटुंबाची साथ हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळाव्या लागल्या तरी तुम्ही त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामं पूर्ण होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने मन आनंदी राहील.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – तुमचे निर्णय आणि विचारसरणी लोकांना प्रभावित करतील. एकामागून एक चांगल्या बातम्या मिळाल्याने उत्साह वाढेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. राहणीमान सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील. नवीन वाहन खरेदीचाही योग जुळून येऊ शकतो.
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आजचा दिवस लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. तुमची मेहनत तुम्हाला यशाच्या आणखी जवळ घेऊन जाईल. कुटुंबाकडून एखादं छान सरप्राइज किंवा भेटवस्तू मिळू शकते. गरजू लोकांना मदत करण्याची तुमची वृत्ती सर्वांचं मन जिंकेल. कामाच्या ठिकाणी आवडीची जबाबदारी मिळाल्याने कामात अधिक उत्साह वाटेल. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)