नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील राष्ट्रीय महामार्गावरील दहेगाव-रंगारी परिसरात रात्री भीषण अपघात झाला. कश्मिरा लॉनसमोर स्विफ्ट डिझायर मोटार वळण घेत असताना मागून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने तिला जोरदार धडक दिली. धडकेमुळे ही मोटार समोरून येणाऱ्या आय वीस मोटारीवर जाऊन आदळली. या भीषण धडकेनंतर आय वीस मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन तब्बल तीन वेळा पलटी झाले. या अपघातात आय वीस मोटारीच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेले अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले असून परिसरातील चित्रफीत तपासून वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Pune Live राम मंदिर चोरी प्रकरणावर कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज आज भूमिका मांडणारअयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज आज पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार असून या प्रकरणाबाबत ते सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. मंदिरातील कथित आर्थिक अनियमितता आणि चोरीच्या आरोपांवर ते स्पष्टीकरण देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Pune Live जेजुरी अपघातग्रस्त वारकऱ्यांना रविंद्र चव्हाणांचा दिलासाभारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जेजुरी येथे अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सरकारच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जखमी वारकऱ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, अशी हमीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याआधी पहाटे त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले असून त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
Kolhapur Live कोल्हापूर केएसबीपी चौकातील अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाईकोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काल रात्री केएसबीपी चौक परिसरात अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत एकूण ३९ हातगाड्यांवर कारवाई केली. विभागीय कार्यालय क्रमांक ३, राजारामपुरी येथील पथकाच्या संयुक्त मोहिमेत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन हातगाड्या, फलक आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले, तर उर्वरित ३७ हातगाड्या संबंधित विक्रेत्यांनी स्वतःहून हटविल्या. कारवाईदरम्यान दोन डंपर आणि एक खुदाई यंत्र तैनात करण्यात आले होते. शहरातील अनधिकृत अतिक्रमणाविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
Pune Live बारामतीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थानजगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम पूर्ण करून बारामती तालुक्याकडे प्रस्थान करणार आहे. आज पालखी गवळ्याची उंडवडी येथे दाखल होणार असून मार्गात दौंड तालुक्यातील वासुंदे परिसरातील अवघड मानला जाणारा रोटी घाट पार केला जाणार आहे. वारकरी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात या सोहळ्यात सहभागी होत असून पालखीच्या स्वागतासाठी मार्गावरील गावांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Pune Live दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर होणारराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत जून-जुलै महिन्यात या परीक्षा पार पडल्या होत्या. दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून, तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
Jejuri Live खंडेरायाच्या जेजुरीचा निरोप घेऊन माऊलींची पालखी वाल्हेकडे प्रस्थानखंडेरायाच्या पवित्र नगरीचा निरोप घेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज वाल्हेकडे प्रस्थान झाला आहे. आजचा मुक्काम वाल्हे येथे होणार असून पुणे जिल्ह्यातील पालखी सोहळ्याचा हा अखेरचा मुक्काम ठरणार आहे. उद्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याने वारकऱ्यांमध्ये भक्तिमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.