Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Marathi July 14, 2026 12:25 PM

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती. मात्र  सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातून आव्हान देण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह  यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप नोंदवला आहे. 9 जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे. याचदरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी एबीपी माझाशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या  नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाही, त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचा कुठलेही कारण नाही, सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून झालेली आहे, अशी प्रफुल पटेल यांनी एबीपी माझाला माहिती दिली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून काढणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सुधारणा पक्षांमध्ये आवश्यक आहे, हे नोटीस येण्याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये माझं मत मी मांडलं. या माझ्या मताचा आणि नोटीसचा कुठलाही संबंध नाही. माझे वैयक्तिक मत आहे की, पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यासाठी पक्षांतर्गत काही सुधारणा करण्याच्या गरजेचे आहे, असं प्रफुल पटेल यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.