कृष्णकांत कोबल
हडपसर: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे भूतपूर्व अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनी आयोजित केल्या जाणाऱ्या या वर्षीच्या सायकल स्पर्धेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकलपटूंसह सुमारे साडेतीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. पवार यांच्या जन्मदिनी २२ जुलै रोजी पुणे ते बारामती अशी ही स्पर्धा होत आहे. येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात या स्पर्धेची नियोजन बैठक झाली. त्यामध्ये संस्थेचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी ही माहिती दिली.
आमदार चेतन तुपे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व मगर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश घुले, माजी उपमहापौर निलेश मगर, मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, नगरसेवक अजित घुले, फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचे अध्यक्ष संतोष सरोदे, माजी नगरसेवक सुनील बनकर, फारूक इनामदार, रयत शिक्षण संस्थेच्या समन्वयक सोनाली घुले, मंगेश मोरे, ओंकार कामठे, भरत झांबरे, वैष्णवी सातव, सुजाता कटके, शबाना शेख, वामन धाडवे, योगेश सूर्यवंशी, मनोज घुले, कलेश्वर घुले, संजय घुले, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य अशोक भोसले, प्राचार्य आर.वाय. पाटील, प्राचार्य आश्विनी शेवाळे, प्राचार्य डॉ. रंजना पाटील, डॉ. रितेश पाटील, डॉ. योगेश पवार आदी यावेळी उपस्थित होते.
Pune: तळेगाव- शिक्रापूर महामार्गावरील मुरळओढ्यात पर्याय रस्त्याची दुरावस्थाॲड. कदम म्हणाले, "स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ही क्रीडा स्पर्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे. दादांच्या जन्मदिनी सकाळी नऊ वाजता ग्लायडिंग सेंटर हडपसर येथून स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा चार गटात होणार असून त्यामध्ये १२२ किलोमीटरची पुणे ते बारामती राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरुषांसाठी, सासवड ते बारामती ही ८५ किलोमीटरची पुरूषांसाठी खुली राज्यस्तरीय तर खास महिलांसाठी माळेगाव ते बारामती ही १५ किलोमीटरची राष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे."
आमदार तुपे पाटील म्हणाले, "ही स्पर्धा हडपसर येथील महत्त्वाची क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेमुळे हडपसरच्या नावलौकिकात भर पडत आहे. यापुढे स्पर्धेची जागतिक स्तरापर्यंत व्याप्ती वाढवता येईल. त्यासाठीचे प्रयत्न आपण सर्वजण करू. दरम्यान, दादा हे स्वच्छतेचे पुजारी होते. त्यांचा हा संदेश व वारसा पुढे नेण्यासाठी जयंती सप्ताहामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी."
Premium|Forest Rights Act : आदिवासींचा एल्गार; ‘तया पलाट हाय गं आमचं’ म्हणत जंगलाशी अतूट नात्याची हाकस्पर्धेतील विजेत्या सायकलपटूंसाठी सुमारे सहा लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या स्पर्धकास राज्य व राष्ट्रीय स्तरावर "घाटाचा राजा" हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्व गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्पर्धकांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी शनिवारवाडा ते हडपसर या दरम्यान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून पर्यावरण संदेश, प्रदूषण, स्वच्छता, वाहतूक याबाबत जनतेला संदेश दिला जाणार आहे. असेही ॲड. कदम यांनी यावेळी सांगितले. बैठकीचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत मुळे यांनी तर आभार अमर तुपे यांनी मानले.