नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील सावळा घाटात बुधवारी संध्याकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ घाटातील वाहतूकही ठप्प झाल्याचं बघायला मिळालंय.
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ-दिंडोरी सीमेवरील सावळा घाटातील उतारावर एक इको कार प्रवास करत होती. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रकने समोरील इको कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कार पुढे जाऊन रस्त्यावरून जात असलेल्या दुसऱ्या ट्रकच्या मागील भागावर आदळली.
Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोपदोन ट्रकांच्यामध्ये कार अक्षरशः चिरडली गेल्याने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाला. सध्या एका जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर काही काळ सावळा घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी दाखल होत जखमींन रुग्णालयात दाखल केलं. तसेच वाहतूक सुरळीत केली.
भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यूपोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु असून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जातो आहे. पुढील कारवाई सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.