5 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्येची धक्कादायक घटना
पाटनेश्वर आदिवासी वाडी परिसरातील ही घटना जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे.
संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
सचिन कदम, साम प्रतिनिधी
रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रायगडच्या पेणमधील पाटनेश्वर आदिवासी वाडीतील एका 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण भिकू वाघमारे असं संशयितला पोलिसांना ताब्यात घेतलंय.
KDMC Hospital: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामीन मंजूरया प्रकरणी चौकशी करत आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुली अत्याचार झाला असल्याची शक्यता वर्तवली जातेय. पीडितेची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदन अहवालातून अत्याचार केला की नाही हे स्पष्ट होणर आहे. दुसरीकडे पोलिसांनी 24 वर्षांच्या संशयित आरोपीला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील आदिवासीवाडीत राहणारी पाच वर्षांची मुलगी घरासमोर झोपली होती. त्यानंतर ती मुलगी गायब झाली. घरात मुलगी दिसत नसल्याने तिच्या आईवडिलांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांच्यापथकाने परिसरात शोधमोहीम हाती घेतली.
३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, पण जात पंचायतीने १ लाखांत प्रकरण दाबले, अन् दारू पार्टी झोडली, चीड आणणारी घटनामंगळवारी सकाळी श्वानपथकही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक फडतरे, पेण पोलीस निरीक्षक जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी श्वान पथकासहित शोध घेतला. त्यानंतर संशयित आरोपी सापडला. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. तर पीडित मुलीचा मृतदेह संशयिताच्या घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी सापडला. पीडित मुलीच्या मृतदेहावर कपडे नव्हते तसेच जखमाही होत्या. यावरुन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पीडित मुलीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पेणमधील रुग्णालयातपाठवण्यात आले आहे.