India vs England first ODI full match report in Mararhi : भारताने पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. आयर्लंड व इंग्लंड यांच्याकडून ट्वेंटी-२० मालिकेत सपाटून मारा खावा लागल्यानंतर भारतीय चाहत्यांना हा विजय सुखावणारा ठरला. रोहित शर्मा, विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनी निराश केले असले तरी कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) , श्रेयस अय्यर यांच्या भागीदारीने विजयाचा पाया भक्कम केला. ४ विकेट्स घेणारा अक्षर पटेल ( Axar Patel) फलंदाजीतही चमकला.
रोहित शर्मा ( ११) व विराट कोहली ( ५) यांच्या अपयशामुळे निराश झालेल्या चाहत्यांना कर्णधार शुभमन गिलने सुखावणारी खेळी केली. जोफ्रा आर्चर व सॅम कुरन यांनी भारताला ४८ धावांवर दोन धक्के दिले. त्यानंतर शुभमन व श्रेयस अय्यर ही जोडी मैदानावर उभी राहिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. शुभमन क्रॅम्प येऊनही मैदानावर उभा राहिला आणि शतकाच्या जवळ असताना वेदना असह्य झाल्याने त्याने retired hurt होण्याचा निर्णय घेतला. त्याने ७५ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारांसह ८० धावा केल्या.
पण, त्याचे जाणे भारताला 'हर्ट' करणारे ठरले, कारण त्यानंतर श्रेयसही ३५ धावांवर रन आऊट झाला. हॅरी ब्रूकच्या भन्नाट थ्रोने त्याला माघारी पाठवले. त्यानंतर लोकेश राहुल ( १) बाहेरचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला. चेंडू त्याच्या बॅटला लागून यष्टींवर आदळला. पटापट विकेट गेल्यने सामन्यात चुरस निर्माण केली खरी, परंतु ४ विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेलने फलंदाजीतही कमाल दाखवली. त्याच्यासोबतीला वॉशिंग्टन सुंदर उभा राहिला.
IND VS ENG 1ST ODI: शुभमन गिलने अचानक मैदान सोडले, श्रेयससोबत चांगला खेळत होता अन्... नेमकं काय घडलं? BCCI म्हणते...अक्षर-वॉशिंग्टनच्या अर्धशतकांनी टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या. आर्चरच्या शेवटच्या षटकात ही जोडी तुटेल अशी अपेक्षाही फोल ठरली. आर्चरने १०-०-६०-१ अशी स्पेल संपवली. अक्षरने अर्धशतक पूर्ण करताना भारताला विजयाच्या आणखी जवळ आणले. अक्षर व वॉशिंग्टन यांनीही नाबाद १०२ धावांची भागीदारी करताना भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अक्षरने ५२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५७ आणि वॉशिंग्टनने ६३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५२ धावांची नाबाद खेळी केली. भारताने ४५.२ षटकांत ४ बाद २६२ धावा करून सामना संपवला.
तत्पूर्वी, बेन डकेट ( ४३)च्या दमदार सुरुवातीनंतर जो रूट ( नाबाद ७६) व लिएम डॉसन ( ६८) यांच्या खेळीने इंग्लंडला २५८ धावांचा सन्मानजनक पल्ला गाठून दिला होता. बिनबाद ६१ वरून ५ बाद ८० अशी दयनीय अवस्था केली. गुरनूर ब्रार व प्रसिद्ध कृष्णा यांनी त्यांच्या एका षटकात प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.पण, रूट व डॉसन यांनी सातव्या विकेटसाठी १२१ धावा जोडल्या. मात्र, अक्षर पटेलने ४ विकेट्स घेताना इंग्लंडला ४७.५ षटकांत २५८ धावांत गुंडाळले.