दिल्लीत मोठी खलबते, एकनाथ शिंदे आणि सहा फुटीर खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांची घेतली भेट
Tv9 Marathi July 15, 2026 03:45 AM

Eknath Shinde Amit Shah Meeting: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. केंद्र सरकारमध्ये संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि लोकसभेत शिवसेना शिंदे गटाची वाढलेली ताकद या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि उबाठा शिवसेनेतून नुकतेच फुटलेले सहा खासदार देखील उपस्थित होते.यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन देखील अमित शाह यांना भेटण्यास पोहचले. राजकारणात या भेटीला महत्व आले आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेची भागीदारी, खासदाराचा अधिकृत पक्षप्रवेश आणि मान्सून अधिवेशन सत्राच्या आधीची रणनिती या मुद्याची चर्चा सुरु आहे.

अमित शाहा यांची भेट

दिल्ली दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आहे. या दरम्यान,अनेक खासदार देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीक केंद्र आणि महाराष्ट्राशी संबंधित राजकीय आणि संघटनात्मक विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, बैठकीनंतर अधिकृतपणे या चर्चांचा विस्तृत अजेंडा समोर आलेला नाही.

लोकसभेत औपचारिक प्रवेश

संसदेच्या आगामी मान्सून अधिवेशनआधी होणाऱ्या या दौऱ्याचा एक प्रमुख उद्देश्य फुटलेल्या सहा खासदाराच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियांना पूर्ण करण्याचा आहे. लोकसभा सचिवालय लवकरच या सहा नवनिर्वाचित खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील शिवसेनेत औपचारिक विलीनीकरणाची घोषणा केली जाऊ शकते. संसदेत पक्षाची स्थिती आणखी मजबूत होणार असून एकनाथ शिंदे यांचे स्थान वाढणार आहे.

दोन महत्वाची पदे मिळण्याची दाट शक्यता

केंद्रीय मंत्रीमंडळाचा संभाव्य विस्तार होण्याचा दावा केला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्र सरकारमध्ये दोन महत्वाची पदे मिळण्याची दाट शक्यता आहे.

एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कॅबिनेट मंत्री हे महत्त्वाचे पद खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिले जाऊ शकते.

एक केंद्रीय राज्यमंत्री पद: पक्षाला एक राज्यमंत्री पद मिळण्याचीही शक्यता असून, त्यासाठी पक्षात चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत प्रामुख्याने या पदावर चर्चा आणि राजकीय सहभाग निश्चित होण्याची शक्यता आहे.

आज अमित भाईंना भेटतांना आमचे सहा खासदार होते.त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांचा विषय बैठकीत चर्चेचा होता. दिल्लीमध्ये आज चांगला पाऊस झाला त्यामुळे मान्सुन सत्रही चांगले होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी हसत म्हणाले. ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांची आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत शिवसेनेत आलेल्या सर्व खासदारांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांना गती देण्याबाबत चर्चा केली.

केंद्राच्या अख्यारित असणाऱ्या विविध प्रकल्प आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी अशी मागणी केल्याचे शिंदे यांनी सांगितले. मतदार संघातील लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून निधी किंवा इतर कोणत्याही बाबींची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही केंद्र गृहमंत्री अमित शाहा यांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.