मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता आहे. नशीबाची साथ मिळाल्यामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमचा मनमिळावू स्वभाव नवीन मित्र जोडण्यास मदत करेल. मात्र, बोलताना कठोर शब्दांचा वापर टाळा. कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. तसेच, कोणालाही पैसे उधार देताना पूर्ण विचार करा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आज तुमची वाणीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. बोलण्यापूर्वी विचार करा आणि इतरांचे मत ऐकून घ्या. विरोधक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुमची समजूतदारपणा त्यांच्यावर मात करेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायातील काही योजनांबाबत संभ्रम असला तरी लवकरच योग्य मार्ग मिळेल.
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आज धनलाभ आणि समृद्धीची शक्यता आहे. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. जुन्या आरोग्याच्या तक्रारी पुन्हा जाणवू शकतात, त्यामुळे आहाराची काळजी घ्या. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. व्यवसायातील मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करा. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. दिखाऊपणासाठी खर्च केल्यास पुढे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. बोलताना जोडीदाराच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांच्या भविष्याबाबत कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. कुटुंबात वाद वाढू नयेत म्हणून संयमाने वागा.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आजचा दिवस शुभ राहील. प्रवासाचा योग आहे. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. पैशांचा योग्य वापर करा. कौटुंबिक बाबींमध्ये रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील सुखसोयींवर खर्च वाढण्याची शक्यता आहे.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज सकारात्मक ऊर्जा तुमच्या सोबत राहील. इतरांना मदत करण्याची संधी मिळेल आणि त्यातून समाधान मिळेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करा. प्रवास करताना वाहन सावधपणे चालवा.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. काही लोक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. कायदेशीर कामांमध्ये धावपळ वाढू शकते. व्यवसायातील भागीदारीशी संबंधित मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व अटी तपासून घ्या.
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आजचा दिवस सामान्य असला तरी अनेक आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. घरासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. वडिलांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. संतती एखाद्या खास वस्तूची इच्छा व्यक्त करू शकते. जुन्या मित्राची भेट झाल्याने दिवस संस्मरणीय ठरेल. मात्र, कुटुंबातील काही विषयांमुळे मनात हलकी चिंता राहू शकते. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)