सलगरे (ता. मिरज) : दूध पावडर आणि खाद्य तेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्या येथील शेतकऱ्यांवर आज अन्न-औषध प्रशासनाने छापा (Food Safety Department raid in Sangli) टाकला. त्यात दोघांकडे संशयास्पद साहित्य आढळून आले. रामचंद्र पाटील व बजरंग पाटील अशी या दूध उत्पादकांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नीलेश मसारे यांनी ही माहिती दिली.
मिरजेपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सलगरे येथे दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती अन्न-औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार काल सकाळी लवकर सलगरे येथे पथक दाखल झाले व सापळा रचत रामचंद्र पाटील, बजरंग पाटील यांच्या शेतात छापा टाकला. त्यात एका ठिकाणी ३ पोती दूध पावडर, १० लिटर तेल आणि ६० लिटर दूध आढळून आले. या दुधाचे फॅट आणि लिटर वाढवण्यासाठी या साहित्याचा वापर केला जाणार होता, असे चौकशीत निष्पन्न झाले.
What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?दुसऱ्या ठिकाणी २४ लिटर तेल आणि पाडवर आढळून आली. दोन्ही उत्पादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दुधाचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे नीलेश मसारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या पथकात प्रवीण दिनकर, अनिल पवार, आवडे मॅडम, आनंदा कवाळे व पुणे येथील दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता.
FDA Raid on Dairy : FDA चा मोठा दणका! 1 लाख 32 हजारांचे दूध जागेवरच नष्ट; दुधात मिसळली जात होती हानिकारक पावडर, मराठवाड्यासह गुजरातला केला जात होता पुरवठा केंद्रातील नमुनेही तपासणीलाबजरंग पाटील आणि रामचंद्र पाटील ज्या डेअरीत दूध घालत होते. त्या डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या दूध संकलन केंद्राचीही तपासणी करण्यात आली. त्या ठिकाणी काही संशयास्पद आढळून आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.