विश्रांतवाडी: येरवडा येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतींचा पुनर्विकास रखडल्याने आणि हवाई दलाच्या निर्बंधांमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी मानवी साखळी करून आंदोलन केले. पोस्ट ऑफिस परिसरातील एमईएस कॉलनी गेट आणि हवाई दलाच्या हद्दीजवळ झालेल्या या आंदोलनात म्हाडा व हवाई दल प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
येथील एल-टाइप आणि एम-टाइप वसाहतीतील घरे १९८० मध्येच धोकादायक घोषित करण्यात आली आहेत. मोडकळीस आलेल्या या घरांमध्ये राहणाऱ्या सुमारे ८०० गाळेधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हवाई दलाच्या १०० मीटर परिघातील निर्बंधांमुळे या घरांच्या पुनर्विकासाला परवानगी नाकारली जात आहे.
Samruddhi Mahamarg: समृद्धीवर कारमध्ये पत्नीला संपवलं, मृतदेहासह अनेक तास फिरला; ३ चिमुकल्यांसह पोहोचला पोलीस ठाण्यातमात्र, त्याच परिसरात शासनाची बांधकामे सुरू असल्याचा आरोप करत रहिवाशांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला. माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यात नगरसेविका शीतल सावंत, नंदिनी धेंडे, नगरसेवक सुहास टिंगरे, रवी टिंगरे, शोभा कांबळे, कांचन निरभवणे, विनोद मोरे, धनराज पवार, बिपीन सोनवणे, कैलास रणपिसे, उल्हास मेहता, ॲड. प्रदीप पाटील, प्रकाश बने आदी सहभागी झाले होते.
शासनाच्या बांधकामांना एक न्याय आणि सर्वसामान्यांच्या घरांना दुसरा, असा दुजाभाव सहन केला जाणार नाही, असा इशारा डॉ. धेंडे यांनी या वेळी दिला. माजी आमदार टिंगरे म्हणाले की, ‘‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’ दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सपना सहारे यांनी सांगितले की, ‘‘हवाई दलाची परवानगी नसताना सुरू असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’’
Petrol-Diesel Price: 15 जुलैचे नवे दर जाहीर! कच्चे तेल 15 डॉलरने महागल्यानंतर मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल आता कितीला?याबाबत म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे यांनी स्पष्ट केले की, ‘‘हवाई दलाच्या हद्दीपासून १०० मीटरपर्यंत बांधकामास बंदी असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय पुनर्वसन करणे शक्य नाही. परवानगी मिळाल्यावर काम सुरू करण्यात येईल.’’ मात्र, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.