Shubman Gill injury update before second ODI: भारतीय संघाने ( IND vs ENG ) पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवला खरा पण, दुखापतीचे सावट तयार झाले आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या वन डेत ६ विकेट्स राखून विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसरा वन डे सामना उद्या होणार आहे, परंतु कर्णधार शुभमन गिल व जलदगती गोलंदाज गुरनूर ब्रार यांच्या खेळण्यावर संभ्रमाचे वातावरण आहे. कारण, या दोघांना कालच्या सामन्यात दुखापत झाली होती आणि जर ते दुसऱ्या सामन्याला मुकल्यास प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल?
शुभमन ८० धावांची खेळी केल्यानंतर क्रॅम्पमुळे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. भारताच्या विकेट पडत असताना तो पुन्हा येईल असे वाटलेले, परंतु तो आलाच नाही. त्यात ब्रार यालाही दुखापत झाली आणि त्यामुळे त्याने त्याचे शेवटचे षटक फेकले नव्हते. ब्रार ४८ वे षटक फेकेल अशी अपेक्षा होती, परंतु रन अप घेताना त्याला त्रास झाला आणि त्याला माघार घ्यावी लागली. त्याच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार केले गेले, परंतु त्याला षटक पूर्ण करता आले नाही. चालताना त्याच्या उजव्या पोटरीला वेदना जाणवत होत्या आणि त्याने मैदान सोडले. अक्षर पटेलने षटक टाकताना दोन विकेट्स घेऊन इंग्लंडचा डाव गुंडाळला.
IND vs ENG 1st ODI: अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी! सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, युवराज सिंगसह सहा जणांशी बरोबरीशुभमन गिलने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह शतकी भागीदारी करताना भारताच्या डावाला आकार दिला. ८० धावांची खेळी करताना त्याच्या पायाला क्रॅम्प आला... वैद्यकीय उपचार घेऊन तो काही काळ मैदानावर उभा राहिला, पण वेदना असह्य झाल्याने त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. सामन्यानंतर जेव्हा वॉशिंग्टन सुंदरला पत्रकार परिषदेत गिलच्या दुखापतीबाबत विचारले गेले, तेव्हा त्याने मला कोणतीच कल्पना नाही, असे सांगितले.
जर हे दोन्ही खेळाडू उद्यापर्यंत तंदुरुस्त न झाल्यास भारताला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागतील. अशा परिस्थितीत गिलच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. तो रोहित शर्मासह सलामीला येऊ शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या मागील वन डे सामन्यात त्याने मधल्या फळीत १२५ धावांची खेळी केली होती. वन डे त सलामीवीर म्हणून त्याने ६१.८७ च्या सरासरीने ४९५ धावा केल्या आणि त्यात बांगलादेशविरुद्धच्या द्विशतकाचा समावेश आहे. ब्रारच्या जागी संघात कुलदीप यादव, अर्शदीप सिंग किंवा प्रिंस यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.