ट्रकच्या मागे Horn OK Please का लिहिलेलं असतं?
Marathi July 15, 2026 06:25 PM




Horn OK Please हे वाक्य महामार्गांवरून धावणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या ट्रकच्या मागे आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. वाहतुकीचा कोणताही नियम नसतानाही, देशभरातील ट्रक्सवर हे वाक्य लिहिण्याची एक परंपराच बनली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की यामागे नेमका काय अर्थ दडला आहे? आजच्या लेखात याच उत्तर जाणून घेऊयात. horn ok please meaning

ट्रक किंवा ट्रॉली, ट्रेलरच्या मागे Horn Ok Please लिहिण्यामागे एक खास कारण आहे. असं सांगितलं की यामागे रंजक इतिहास आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगभरात इंधनाचा, विशेषतः डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. युद्धामुळे सैन्यासाठी डिझेलचा साठा राखीव ठेवला जात असे. अशा कठीण परिस्थितीत मालवाहू ट्रक्स चालू ठेवण्यासाठी एक वेगळा मार्ग शोधण्यात आला. डिझेलऐवजी ट्रकमध्ये केरोसीन वापरून गाड्या चालवल्या जाऊ लागल्या. केरोसीन हे डिझेलच्या तुलनेत अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक इंधनाचे रूप आहे. केरोसीनवर चालणारे हे ट्रक्स थोडे जरी धडकले किंवा त्यांचा अपघात झाला, तर ते लगेच पेट घ्यायचे आणि त्यांचे रूपांतर एका मोठ्या बॉम्बमध्ये व्हायचे. त्यामुळे मागून येणाऱ्या इतर वाहनचालकांना सावध करण्यासाठी ट्रकच्या मागे एक विशेष वॉर्निंग लिहिली जाऊ लागली. ती चेतावणी म्हणजे Horn Please: On Kerosene.

Horn Please: On Kerosene याचा अर्थ असा होता की, “हा ट्रक केरोसीनवर चालत आहे, त्यामुळे कृपया हॉर्न वाजवून सुरक्षित अंतर राखूनच ओव्हरटेक करा. काही काळाने पुढे जाऊन याच On Kerosene चा OK हा शब्द तयार झाला आणि तो Horn Please च्या मध्यभागी लिहिला जाऊ लागला.

हेही वाचा – DMart मध्ये शॉपिंग? या सीक्रेट ट्रिक्सने वाचतील हजारो रुपये



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.