विकास काटे, साम टीव्ही
ठाणे: स्मार्ट मीटर लावण्यावरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असताना ठाण्यात अजब प्रकार घडला आहे. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठाण्याच्या सावरकरनगरमध्ये दुपारी रहिवाशी झोपले असताना घराची बाहेरून कडी लावून लपून स्मार्ट मीटर लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर स्मार्ट मिटर लावण्यासाठी घोडबंदरवरील एका संकुलातील सहा इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर केवळ व्यापारी संकुल, आस्थापना यांना लावला जाईल सामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले जाणार नाही असे विधिमंडळाच्या अधिवेशनात आश्वासन देऊन विरोधकांना धारेवर धरले होते. तेच मुख्यमंत्रीफडणवीस आता स्मार्ट मीटर अनिवार्य आहे असे सांगू लागल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
Rain Alert : राज्यात २१ जुलैनंतर जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? वाचास्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरला तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने अदानी कंपनीचे हे खासगी मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी नवीन परिपत्रक काढून दबाव टाकत आहे. ज्या गृहनिर्माण संकुलात स्मार्ट मीटर लावले जात नाही त्याचा वीज पुरवठा खंडित करण्याचा अन्यायकारक प्रकार करीत आहे. घोडबंदर रोडवरील विहंग गृहसंकुलातील तब्बल ६ इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार महावितरण कंपनीने केला आणि स्मार्ट मीटर लावण्यासाठी जुलूम करण्यास सुरुवात केली आहे. जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम राबविली जात असून त्यासाठी लोकांच्या घरांना कडी लावून मिटर बदलले जात आहे.
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! घाटकोपर- वर्सोवा प्रवास होणार गर्दीमुक्त; काय आहे मेट्रोचा प्लान?स्वा.सावरकर नगरमधील डेनिस कंपाऊंडमध्ये आज (डेनिस चाळीत) रहिवाशी दुपारच्या वेळेस झोपेत असताना चक्क दरवाजा बंद असताना त्या दरवाजाला बाहेरून कडी लावून जुने मिटर काढून - नवीन स्मार्ट मिटर लावल्याचा प्रकार घडला. सायंकाळी हा प्रकार लक्षात आला आहे. परिसरात २४ तास लाईट जाते त्यावेळी अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता, मेंटेनन्स नाही अशी कारणे सांगितली जातात. आता दुपारच्यावेळी राहिवाशांच्या दरवाजाला कड्या लावून जुने मिटर पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मार्ट मिटर लावून पळून जाणे आणि नंतर जुने मिटर ब्रेक करून टाकत असल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत.