Sakal Abhang Amrut : 'सकाळ अभंग अमृत'चा २५ जुलैला स्वराविष्कार; पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज करणार अभंग सादर
esakal July 16, 2026 03:45 AM

पिंपरी - आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात पिंपरी चिंचवडकरांना विठ्ठलनामाच्या गजरात मंत्रमुग्ध करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे २५ जुलैला ‘अभंग अमृत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा सांगीतिक वारसा पुढे नेणारे त्यांचे नातू आणि पंडित श्रीनिवास जोशी यांचे चिरंजीव विराज जोशी हे ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘माझे माहेर पंढरी’ अशा अनेक अजरामर रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील. विराज यांना ‘भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी फेलोशिप’ आणि ‘युवा टॅलेंट पुरस्कार’ मिळाला आहे.

नुकताच त्यांचा अमेरिका दौराही यशस्वी ठरला आहे. तिकीट विक्रीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘बुक माय शो’ व प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे तिकीट विक्री सुरू आहे. या अभंग सोहळ्याचा पिंपरी चिंचवड आणि परिसरातील संगीतप्रेमी व विठ्ठलभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूहातर्फे करण्यात आले आहे.

विराज जोशी यांच्यासमवेत सुरेल गप्पा, गोष्टी आणि किस्से एक अनोखी मैफलीने रसिक मंत्रमुग्ध होणार आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ९ ते ११.३० वाजता आणि सायंकाळी ५ ते ८ यावेळेत तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

कुठे? कधी? केव्हा?

कुठे - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

कधी - २५ जुलै २०२६ (शनिवार)

केव्हा - सायंकाळी साडेपाच वाजता

असे आहेत तिकीट दर : ३०० रुपये, २०० रुपये

अधिक माहितीसाठी संपर्क : नितीश उबाळे - ७७०९०९७१११

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.