असं म्हणतात की वयाची साठी ओलांडली की शरीरात थकवा येणे, चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. पण बॉलीवूडचा अण्णा म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी याला अपवाद आहे. आजोबा झाला असला तरी वयाच्या 64 व्या वर्षी सुनील शेट्टीच फिटनेस पाहून सर्वच थक्क होतात. वयाच्या 64 व्या वर्षीही सुनील शेट्टीच पिळदार शरीर आणि चेहऱ्यावरील तेज पाहून सर्वच जण त्यांच्या फिटनेस रूटीनविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
सकाळी उठण्याची वेळ
सुनील शेट्टी सकाळी 5.30 वाजता उठतो. उठल्यावर व्यायाम करतो. सुरूवातीचा एक तास योग आणि प्राणायाम करतो. त्यानंतर 45 मिनिटे जिममध्ये व्यायाम करतो.
नाश्ता
सुनिल शेट्टी सकाळी ब्रेकफास्टमध्ये चांगले प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट खातो. विशेष म्हणजे ब्लॅक कॉफी पिताना त्यात खजूर घालतो.
साखर आणि तेलाचे प्रमाण कमी
सुनील शेट्टी फिट असण्यामागे सर्वात मोठा नियम तो फॉलो करतो म्हणजे आहारात साखर आणि तेलाच प्रमाण कमी ठेवतो.
तांदूळ
सुनिल शेट्टी दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात भात खातो. फक्त पांढरा तांदूळाऐवजी लाल तांदळाचा भात खातो.
जेवणाची वेळ
रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या आसपास किंवा सहाच्या दरम्यान करतो. यामुळे अन्न पचायला वेळ मिळतो.
सुनील शेट्टीचं फिटनेस सिक्रेट –
सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक गैरसमज आहेत, जसे की फिट होण्यासाठी पैसे आवश्यक असतात. परंतू तसे नाही. घरी बसून सुद्धा संतुलित आहार घेऊन तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. अशा परिस्थितीत, इतर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा, असं तो सांगतो.
हेही वाचा – तणावामुळे वारंवार भूक लागते? ‘स्ट्रेस ईटिंग’ची लक्षणं, कारणं आणि उपाय