वर्षाच्या सुरुवातीला रशिया-इराण युद्धाचे भूराजकीय तणाव आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (FII) विक्रीमुळे आयपीओ बाजार काहीसा मंदावला होता. विशेषतः एप्रिल आणि मे महिना अत्यंत सुस्तावलेला राहिला, जिथे मे महिन्यात एकही आयपीओ आला नाही. मात्र, जुलै महिन्यापासून बाजाराने पकडलेला वेग आता ऑगस्टमध्ये अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ही पर्वणी असणार आहे.
ऑगस्ट महिन्यात तब्बल २५ कंपन्या शेअर बाजारात पदार्पण करून तब्बल ३५,००० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
New-Age कंपन्यांची बाजारात चलती: PhonePe अन् Zepto चे मोठे इश्यूऑगस्ट महिन्यात येणाऱ्या प्रमुख आयपीओमध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचे (New-Age Companies) वर्चस्व पाहायला मिळणार आहे:
- PhonePe: वालमार्टच्या मालकीची ही डिजिटल पेमेंट्स कंपनी सुमारे १२,००० कोटी रुपयांचा सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.
- Zepto: क्विक-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ८,०१० कोटी रुपये उभारणार आहे.
- Shiprocket: लॉजिस्टिक्स क्षेत्रातील ही कंपनी २,३४२.३५ कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू आणणार आहे.
जुलैमध्ये एसबीआयचा एएमसीचा डंका, आता Manipal Health चा पुढील नंबरजुलै महिन्यात एसबीआय फंड्स मॅनेजमेंटने ९,८१३ कोटी रुपये उभारून या वर्षातील सर्वात मोठा यशस्वी आयपीओ नोंदवला, ज्याला ४१.६६ पट प्रतिसाद मिळाला. यानंतर आता Manipal Health Enterprises चा ९,२७५.२२ कोटी रुपयांचा इश्यू २९ ते ३१ जुलै दरम्यान येत असून, ५ ऑगस्ट रोजी त्याचे शेअर बाजारात सूचिबद्धीकरण (Listing) होणार आहे.
इतर महत्त्वाचे आगामी आयपीओऑगस्टच्या रांगेत ट्रुहोम फायनान्स (३,००० कोटी रुपये), इनोवेटीव्हिव्ह इंडिया (२,००० कोटी रुपये), ज्युपिटर ग्रीन एनर्जी (१,८०० कोटी रुपये) आणि गाजा अल्टरनेटीव्ह एसेस्ट मॅनेजमेंट (६५६.२ कोटी रुपये) या कंपन्यांचा समावेश आहे.
याशिवाय, ओयो (Prism), मोलबायो (Molbio), धुत ट्रान्समिशन, हॉरिझन इंडस्ट्रीअल पार्क्स, Ardee Industries,वार्मोरा ग्रॅनिटो आणि लिप इंडिया यांसारख्या अनेक कंपन्या आपले आयपीओ लॉन्च करणार आहेत.
ऑगस्ट महिन्यातच कंपन्यांची घाई का?तज्ज्ञांच्या मते, कंपन्या ऑगस्टमध्येच आयपीओ आणण्यासाठी उत्सुक असण्याची तीन प्रमुख कारणे आहेत:
१. सेबीने (SEBI) दिलेल्या मंजुरीची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे.
२. नजीकच्या काळात NSE आणि Jio Platforms यांसारख्या अब्जावधी डॉलर्सच्या मोठ्या आयपीओंची गर्दी होणार आहे, त्यापूर्वी आवश्यक आहे.
३. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या पितृपक्षाच्या काळात (Shraadh Period) गुंतवणूकदार नवीन गुंतवणुकीपासून दूर राहतात, त्यामुळे त्यापूर्वीच आयपीओ पूर्ण करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे.
थोडक्यात यंदा २० अब्ज डॉलर्स उभारण्याचा अंदाजPrime Database च्या आकडेवारीनुसार, या वर्षात आतापर्यंत ३७ आयपीओंच्या माध्यमातून ४८,८५२ कोटी रुपये उभारले गेले आहेत. २४ जुलैपर्यंत १७८ कंपन्यांना सेबीकडून २.९ लाख कोटी रुपये उभारण्याची मंजुरी मिळाली आहे, तर ७० कंपन्या (१.८० लाख कोटी रुपयांचे प्रस्ताव) मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. संपूर्ण २०२६ या कॅलेंडर वर्षात भारतीय प्राथमिक बाजारातून तब्बल २० अब्ज डॉलर्स (सुमारे १.६५ लाख कोटी रुपये) उभारले जातील असा विश्वास गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.