पैसे तयार ठेवा, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 5 नवीन Mutual Funds सुरू, गुंतवणूक रकमेसह तपशील जाणून घ्या
ET Marathi July 27, 2026 05:45 PM
मुंबई : शेअर बाजारात अस्थिरता असूनही म्युच्युअल फंडांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालेला नाही. जून २०२६ च्या आकडेवारीनुसार, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडांमधील गुंतवणूक सातत्यपूर्ण राहिली आहे. गुंतवणूकदारांची ही तीव्र आवड लक्षात घेऊन मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs) नवीन फंड योजना (NFOs) सादर करत आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाच नवीनखुले होत आहेत. यामध्ये चार एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETFs) आणि एक फंड ऑफ फंड्स (FoF) यांचा समावेश आहे.

इन्व्हेस्को इंडिया निफ्टी बँक ETF
सबस्क्रिप्शन सुरू : २८ जुलै
बंद : ११ ऑगस्ट
किमान गुंतवणूक : ५,००० रुपये

हा ETF निफ्टी बँक इंडेक्सला ट्रॅक करतो आणि बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी देतो.

इन्व्हेस्को इंडिया बीएसई सेन्सेक्स ईटीएफ

सुरू : २८ जुलै
बंद : ११ ऑगस्ट
किमान गुंतवणूक : ५,००० रुपये

ही योजना बीएसई सेन्सेक्स निर्देशांकाला अनुसरून असेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना देशातील टाॅप ३० कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

एसबीआय निफ्टी मिडकॅप १५० मोमेंटम ५० ईटीएफ एफओएफ
सुरू : २७ जुलै
समाप्ती : ५ ऑगस्ट
किमान गुंतवणूक : ५,००० रुपये

हा एक फंड ऑफ फंड्स (एफओएफ) आहे. हा फंज एसबीआय निफ्टी मिडकॅप १५० मोमेंटम ५० ईटीएफमध्ये गुंतवणूक करेल. याचे लक्ष मिड कॅप कंपन्यांच्या पोर्टफोलिओवर असेल.

डीएसपी बीएसई मिडस्मॉल प्रायव्हेट बँक्स ईटीएफ
सुरू : २८ जुलै
बंद : ३० जुलै
किमान गुंतवणूक: ५,००० रुपये

हा मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप प्रायव्हेट बँकिंग शेअर्सध्ये गुंतवणूक करण्याची संधी देईल.

एडलवाईस बीएसई लार्जमिड (६०:४०) स्टेबल डिव्हिडंड ५० ईटीएफ
सुरू : २७ जुलै
बंद : २९ जुलै
किमान गुंतवणूक : ५,००० रुपये

हा ईटीएफ स्थिर डिव्हिडंड रेकॉर्ड असलेल्या कंपन्यांच्या निर्देशांकाचा मागोवा घेईल. यामध्ये लार्ज कॅप आणि मिड कॅप शेअर्सचे ६०:४० गुणोत्तर असेल.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.