रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 27, 2026 07:43 PM

Manasi Kulkarni share screen with daughter in marathi film: सिनेसृष्टीतील कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच (Mansi Kulkarni) आकर्षण असते.  त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असतात. दरम्यान, (Marathi Film) असाच एक खास योगायोग आगामी मराठी चित्रपट 'द्विधा' या सिनेमातून समोर आला आहे. या सिनेमात मानसी कुलकर्णी यांनी 'श्रावणी' ही व्यक्तीरेखा (Entertainment) साकारली आहे. तिच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे. ‘द्विधा' चित्रपटाच्या निमित्ताने ही मायलेकीची जोडी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

‘द्विधा' मध्ये झळकणार मानसी कुलकर्णी आणि तिची लेक! (Manasi Kulkarni share screen with daughter in Dwidha)

मुख्य म्हणजे, ओवीचा मोठ्या पडद्यावरचा हा पहिलाच ‘ऑनस्क्रीन’ प्रयत्न आहे. तिने आत्मविश्वास, आणि निरागसतेने ही भूमिका साकारत सर्वांची दाद मिळवली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले आहे. तर, निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत. हा सिनेमा येत्या 21 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.  या चित्रपटाविषयी मानसी कुलकर्णी म्हणाल्या, ‘श्रावणीच्या बालपणीच्या भूमिकेसाठी ओवीची निवड हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता. आई म्हणून तिचा पहिला ऑनस्क्रीन प्रवास पाहताना अभिमान वाटत होता, सोबत तिच्या अभिनयातील सहजता आणि आत्मविश्वास पाहून समाधान मिळालं. तिने ही भूमिका मनापासून आणि अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे.’, असं त्या म्हणाल्या.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

पहिल्याच अभिनय अनुभवाबद्दल ओवी म्हणाली, ‘सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण आई आणि संपूर्ण टीमने मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी ही भूमिका आत्मविश्वासाने साकारु शकले. 'द्विधा'मधून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.’, अशी भावना तिनं व्यक्त केली.

'द्विधा' हा केवळ बाप-लेकीच्या नात्यावर आधारित चित्रपट नसून, प्रत्येक नात्यातील प्रेम, विश्वास अन् भावभावनांचा हळवा प्रवास संवेदनशीलतेने मांडणारा चित्रपट आहे. या सिनेमात सतीश पुळेकर, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Influencer Abhinav Bisht Goes Viral: सीजीपीच्या आंदोलनात अभिनवची चर्चा, रातोरात झाला नॅशनल क्रश; 'तो' इन्फ्ल्युएंसर आहे तरी कोण?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.