आपलं मुल सुदृढ आणि सुरक्षित राहावं यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करत असतात. त्यामुळे घर असो की शाळा मुलांच्या लहान सहान गोष्टींबाबत पालक नेहमीच जागरूक असतात. यात मग मुलांना शाळेत जाताना कोणता डबा , वॉटर बॉटल द्यायची याचाही पालक विचार करतात. कारण आता बाजारात काचेपासून प्लास्टीक, स्टील तांब्यापर्यंत वॉटर बॉटल आणि डबे आकर्षक रंगात व आकारात सहज मिळतात.
यावर तज्त्र म्हणतात कि फक्त दिसायला छान आहे म्हणून वस्तू न घेता ती मुलांच्या आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे ते देखील पाहायला हवे. कारण ज्या धातूच्या बाटलीतल मुलं पाणी पितात किंवा डब्यातलं खातात त्याचा मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यासाठी मुलांच्या सुरक्षेसाठी काही ठराविकच धातु आहेत. त्यांच्याच भांड्यातून मुलांना पाणी आणि अन्न द्यावे.
प्लास्टीक
बाजारात मुलांना आकर्षक करतील अशा आकाराच्या व रंगाच्या प्लास्टीक वॉटर बॉटल आणि डबे उपलब्ध आहेत. तसेच प्लास्टीक वजनानेही हलके असते. त्यामुळे पालक प्लास्टीक वॉटर बॉटल आणि डब्याला प्राधान्य देतात. पण तसे न करता
स्टील
तज्ज्ञानुसार मुलांसाठी स्टीलची बाटली हे बेस्ट ऑप्शन आहे. स्टीलची बाटली मजबूत असते आणि सहजा सहजी फाटत किंवा फुटत नाही. मुलाच्या हातातून स्टीलच डबा किंवा बाटली जरी खाली पडली तरी ती फुटत नाही. तसेच स्टील खऱाबही होत नाही. यातून दुर्गंधी येत नाही. यात ठेवलेले अन्न पाणी सुरक्षित असते. त्यामुळे मुलांना स्टीलचा डबा किंवा वॉटर बॉटल देणे सुरक्षित आहे.
प्लास्टीक
प्लास्टीकच्या वस्तू वजनास हलक्या आणि वापरण्यास सोयीस्कर असून खिशाला परवडणाऱ्या असतात त्यामुळे आपल्य़ाकडे लहान मुलांना प्लास्टीकच्या डब्यातून खाण्याचे पदार्थ आणि प्लास्टीक बाटलीतूनच पाणी दिले जाते. पण प्लास्टीकच्या बाटलीत गरम पाणी भरल्यास प्लास्टीकमधील BPA
सारखे रसायन पाण्यात मिसळतात. या रसायनांचा थेट परिणाम शरीरातील हार्मोन्सवर होतो. त्यामुळे पुढे जाऊन मुलांमध्ये स्थूलतासारख्या समस्या उद्भवतात. तसेच प्लास्टीकची बाटली जर कुठे गलत असेल तर त्यात बॅक्टेरिया जमा होतात. तेच पाणी पिल्याने मुलांना इन्फेक्शन होते.
तांबे
हल्ली बरेचजण पाण्यासाठी तांब्याची बाटली वापरतात.पण या बाटलीत गरम पाणी, लिंबू पाणी, ज्यूस किंवा कोणतेही आंबट पेय ठेवल्यास आणि ते पिल्यास मुलांना पोटदुखी , उलटी यासाखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे मुलांना स्टील धातुपासून बनवलेल्या भांड्यातूनच अन्न व पाणी द्यावे. असे तज्ज्ञांनी सांगितल आहे.