Free Education: जगातील 'या' देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत...सरकारच उचलते सर्व खर्च!
esakal July 27, 2026 09:45 PM

Best Countries For Free Education!: भारतामध्ये शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस गगनाला भिडत असून, सर्वसामान्य पालकांसाठी मुलांचे शिक्षण ही एक मोठी आर्थिक कसोटी ठरत आहे. अलीकडेच नीट (NEET) परीक्षा घोटाळा आणि वाढत्या शैक्षणिक महागाई विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. भारतात नर्सरीपासूनच खासगी शिक्षण महाग झाले असताना, जगातील अनेक विकसित देशांमध्ये मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते. जगातील प्रमुख देशांमध्ये शिक्षणाची काय व्यवस्था आहे,हे जाणून घेवूयात..

जर्मनी (Germany)

जर्मनीमधील सर्व सरकारी (Public) विद्यापीठांमध्ये देशातील तसेच परदेशातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण (पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण) पूर्णपणे मोफत आहे. येथे कोणतीही ट्युशन फी आकारली जात नाही. विद्यार्थ्यांना फक्त प्रशासकीय खर्चासाठी आणि सार्वजनिक वाहतूक पाससाठी दर सत्रानुसार (Semester) साधारण १०० ते ३०० युरो इतके नाममात्र शुल्क द्यावे लागते.

नॉर्वे (Norway)

नॉर्वेच्या सरकारी विद्यापीठांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांप्रमाणेच परदेशी विद्यार्थ्यांनाही पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट (Ph.D.) पर्यंतचे संपूर्ण शिक्षण मोफत दिले जाते. शिक्षणासाठी कोणतीही फी नसली तरी विद्यार्थ्यांना राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च स्वतः करावा लागतो. तसेच काही विद्यापीठांमध्ये फक्त सत्र शुल्क (Semester Fee) घेतले जाते.

फ्रान्स (France)

फ्रान्समधील बहुतांश सरकारी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण अत्यंत कमी खर्चात किंवा मोफत उपलब्ध करून दिले जाते. युरोपीय युनियन शिवाय इतर देशांतील विद्यार्थ्यांसाठी काही मोजक्या ठिकाणी अल्प प्रमाणात फी आकारली जाते, पण फ्रान्स सरकार विद्यार्थ्यांच्या राहण्याचा खर्च, आरोग्य विमा आणि शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत (Subsidies) करते.

यशस्वी व्हायचंय? मग डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचे 'हे' 5 जीवनमंत्र नक्की पाळा! फिनलंड आणि स्वीडन (Finland & Sweden)

हे नॉर्डिक देश आपल्या उत्कृष्ट शिक्षण प्रणालीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. येथे युरोपीय महासंघाच्या (EU/EEA) नागरिकांसाठी शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. इतर देशांतील विद्यार्थ्यांसाठी काही अभ्यासक्रमांना फी असली, तरी गुणवान विद्यार्थ्यांसाठी सरकार आणि विद्यापीठांकडून पूर्ण किंवा आंशिक स्कॉलरशिप्स (Scholarships) दिल्या जातात.

ऑस्ट्रिया (Austria)

ऑस्ट्रियातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अतिशय कमी खर्चात शिक्षण घेण्याची संधी मिळते. युरोपीय युनियन बाहेरील देशांतील विद्यार्थ्यांनाही अगदी नाममात्र फी आकारली जाते, ज्यामुळे जगभरातून विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येतात.

क्युबा आणि डेन्मार्क (Cuba & Denmark)

या देशांमध्ये प्राथमिक शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च राज्य सरकार उचलते. काही निवडक देशांमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश, शालेय जेवण आणि प्रवासाची सुविधाही सरकारतर्फे पुरवली जाते.

इटली, स्पेन आणि चेक प्रजासत्ताक (Italy, Spain & Czech Republic)

इटली: शालेय शिक्षण पूर्णपणे मोफत असून उच्च शिक्षणासाठी अत्यंत कमी फी आकारली जाते. तसेच पात्र विद्यार्थ्यांना मोफत जेवण आणि स्वस्त वस्तीगृहांची सुविधा मिळते.

स्पेन: स्पेन सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा जवळपास ८० टक्के खर्च स्वतः उचलते, त्यामुळे तेथे नाममात्र खर्चात उच्च शिक्षण होते.

चेक प्रजासत्ताक: चेक भाषा शिकण्याची तयारी असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना हे देश मोफत उच्च शिक्षण देतात.

भारतात शिक्षणाचे व्यापारीकरण झाले असताना आणि पालकांना प्रचंड आर्थिक तणावाचा सामना करावा लागत असताना, जगातील हे देश "शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे" या तत्त्वावर काम करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची समान संधी उपलब्ध करून देत आहेत.

Education Ministry latest news : मोठी घडामोड! विनीत जोशींची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदावरून हकालपट्टी
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.