भारतातील तरुणांमध्ये बिअरची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजकाल तरुणांसोबत तरुणीदेखील बिअर प्यायला लागल्या आहेत. पण अशा काही बिअर आहेत, ज्या भारताच्या खूपच पसंतीस पडतात.
तरुणांना आवडणारे बिअरचे अनेक ब्रँड्स आहेत. पण यात सर्वात अगोदर नाव येते ते Kingfisher Premium या बिअरचे. ही भारतातील तरुणांची सर्वाधिक पसंतीची बिअर मानली जाते. तिची चव, परवडणारी किंमत आणि देशभरातील सहज उपलब्धता यामुळे ती मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते.
याशिवाय Budweiser Magnum, Heineken, Tuborg Green, Carlsberg Elephant आणि Bira 91 Blonde हे बिअर ब्रँड्सही तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. शहरी भागातील तरुणांना Bira 91 Blonde ही बिअर खूप आवडते.
दुसरीकडे Budweiser आणि Heineken यांना बिअरलाही लोक खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तसं पाहायचं झालं तर प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे मद्य आवडू शकते. त्यामुळे संपूर्ण देशात एकाच प्रकारचा बिअर ब्रँड पसंद केला जातो, असे गृहित धरणे चुकीचेच ठरेल.
महत्त्वाची सूचना: मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे मद्यप्राशन करू नये. आम्ही मद्यप्राशन करण्यास प्रोत्साहन देत नाही.