म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
विजय केसरकर, एबीपी माझा July 28, 2026 03:13 PM

कोल्हापूर : लग्नासाठी तगादा लावल्याने कोल्हापूरच्या माजी सरपंच महिलेची हत्या केल्याचा (Kolhapur Crime News) प्रकार घडला आहे. प्रियकरानेच गळा दाबून खून करून मृतदेह कारमधून नेत असल्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस (Kolhapur Crime News)आला. माझ्याशी लग्न कर म्हणून धमकावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून केल्याची प्राथमिक माहिती भिवंडी पोलिसांकडून मिळत आहे. खून झालेल्या महिलेचं नाव सुरेखा शिवाजी न्यारे असून, त्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या खून प्रकरणी संशयित प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला भिवंडी (Kolhapur Crime News) पोलिसांनी अटक केली आहे. शिरगाव येथे खून केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःच्याच गाडीतून मृतदेह भिवंडीकडे घेऊन जात होता. पोलिसांनी गाडी पकडल्यानंतर खून केल्याचं उजेडात आलं. या प्रकरणाचा अधिक तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.(Kolhapur Crime News)

Kolhapur Crime News: माझ्याशी लग्न कर म्हणून धमकी अन्....

माझ्याशी लग्न कर म्हणून सतत मागे लागलेल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना भिवंडी येथे उघडकीस आली आहे. सुरेखा शिवाजी न्यारे असे मृत महिलेचे नाव असून, त्या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय ४०, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबाबत संदेश सर्जेराव मोरे (वय २७, रा. भिवंडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Kolhapur Crime News)

Kolhapur Crime News: नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे या आरोपी प्रकाश पाटील याच्या घराशेजारीच राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून सुरेखा या प्रकाशकडे लग्नासाठी सतत तगादा लावत होत्या आणि त्याला धमकावतही होत्या. या त्रासाला कंटाळून रविवारी (२६ जुलै) सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिरगाव येथील 'लिडोंरीचा वाड्या'जवळ असलेल्या म्हशीच्या गोठ्यात प्रकाशने सुरेखा यांचा गळा दाबून खून केला.

Kolhapur Crime News: मृतदेहाची विल्हेवाट लावताना पोलिसांच्या जाळ्यात

हत्येनंतर घटनेचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी प्रकाश स्वतःच्या चारचाकी गाडीतून सुरेखा यांचा मृतदेह भिवंडीच्या दिशेने घेऊन जात होता. मात्र, भिवंडीजवळ पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ही गाडी अडवली. गाडीची तपासणी आणि चालकाची चौकशी केली असता हत्येचा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Kolhapur Crime News: कारच्या डिक्कीत भरला मृतदेह अन्....

शिरगाव येथे खून केल्यानंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःच्याच गाडीतून मृतदेह भिवंडीकडे घेऊन जात होते. पोलिसांनी गाडी पकडल्यानंतर खून उजेडात आला. या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.