Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या
Saam TV July 28, 2026 04:45 PM
  • निलंगा आगाराची बस दोन स्कूलबसवर धडकली

  • प्रवाशाने स्टेअरिंग ओढल्याने बसचा अपघात

  • चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

संदीप भोसले, साम प्रतिनिधी

लातूर–औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी एक धक्कादायक अपघात झाला. निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्यानं बस मोकळ्या जागेत नेली आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Pune Accident: सासवड बायपासवरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉलीला कार धडकली

हाती आलेल्या माहितीनुसार, निलंगा आगाराची एमएच-२० बीएल-२५७० क्रमांकाची एसटी बसदुपारी सुमारे दीड वाजता लातूर बसस्थानकातून औसाकडे जात होती. पेठ परिसरातील किड्स शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंग ओढली. त्यामुळे बस वळवली आणि रस्त्याच्या बाजुला असलेल्या स्कूल बसला धडकली, असा आरोप प्रत्यक्षदर्शी व बसमधील प्रवाशांनी केला आहे.

अचनाक स्टेअरिंग ओढल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातातएमएच-२६ एन-९१४३ व एमएच-२५ टी-०५८६ क्रमांकाच्या दोन्ही स्कूलबसचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झालंय. ही घटना घडताच बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, बसने दोन स्कूलबसना धडक दिल्यानंतरही चालकाने धैर्य न गमावता बस सुमारे शंभर फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबविली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता टळली. त्या वेळी स्कूलबस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सुदैवाने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.