-अशोक सस्ते
आसू : भारताने खासगी क्षेत्रात विकसित केलेले पहिले ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-१’ नुकतेच श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या अंतराळात प्रक्षेपित केले. या ऐतिहासिक मोहिमेत जिल्ह्यातील फलटण (मलठण) येथील संकेत दत्तात्रय कदम याचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिल्याने फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढया यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताने खासगी क्षेत्रातून ऑर्बिटल रॉकेट विकसित करून कक्षीय प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरा देश म्हणून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या ऐतिहासिक मोहिमेत फलटणच्या सुपुत्राचा सहभाग असल्याने त्याचेही कौतुक होत आहे.
भारताच्या अंतराळ क्षेत्रातील या ऐतिहासिक यशामुळे संकेतसह कुटुंबीयांचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, फलटणचे पोलिस उपअधीक्षक आदींसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
संकेतचे वडील जिल्हा पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. आई गृहिणी आहे. मुलाने डॉक्टर व्हावे, अशी संकेतच्या वडिलांची इच्छा होती. बारावीनंतर संकेतला वैद्यकीय क्षेत्रातील बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालाही होता.
मात्र, वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अभियांत्रिकीची आवड असल्याने त्याने कुस्रो वाडिया टेक्नॉलॉजी (पुणे) येथे ईएनटीसी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि आपल्या आवडीच्या करिअरकडे पाऊल टाकले.
माझ्या आई वडिलांसह स्नेहल, सोनाली, सायली या बहिणींचे खूप प्रोत्साहन मला लाभले असून, यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीचे संस्थापक नागा भरत डाका आणि पवन कुमार चंदना यांच्यासह सर्व सहकारी टीमचे अभिनंदन केल्याचेही संकेतने सांगितले.
रॉकेटचे वैशिष्ट्य...‘विक्रम-१’ हे रॉकेट पृथ्वीनजीकच्या कक्षेत लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. सुमारे ४५० किलोमीटर उंचीवरील कक्षेत पेलोड यशस्वीपणे स्थापित करण्याची क्षमता त्यामध्ये आहे.
या रॉकेट मोहिमेत सुमारे ४०० ते ५०० सहकारी वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून काम करत होत्या. त्यात मी फ्लाईट सॉफ्टवेअर माध्यमातून कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इव्हॅनिक्स यासाठी योगदान दिले आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात मला रॉकेट्री रिडिंगची आवड निर्माण झाली. ती संधी मला स्कायरूट एरोस्पेस मध्ये मिळाली. एरोस्पेससाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-संकेत कदम
NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेप संकेतचा शैक्षणिक प्रवासकुस्त्रो वाडिया टेक्नॉलॉजीत ईएनटीसी पदविका अभ्यासक्रम
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे पदवी शिक्षण
कॉलेजच्या ऑर्बिटीकल क्लबमध्ये सहभाग
ब्राझील येथील लॅटीन अमेरिका स्पेस चॅलेंजमध्ये सहभाग
एआरएआय ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया येथे इंटर्नशिप
वेक्टर इन्स्टिट्यूट ऑफ बंगळूर येथे एम्बेडेड सिस्टीम हा कोर्स पूर्ण
फेब्रुवारी २०२३ मध्ये स्कायरूट एरोस्पेसमध्ये निवड
सध्या एव्हिऑनिक्स एम्बेडेड सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत