Kangana Ranaut Statement Generation Gutter: लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अलिकडेच तिनं 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Cockroach Janta Party) आंदोलनावर भाष्य केलं. यानंतर तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. अलिकडेच अभिनेत्रीने 'हिंदू तरुणी' असा उल्लेख करत आजच्या तरुणींवर टीकेचे बाण सोडले. इन्स्टाग्राम (Instagram Post) स्टोरीवर तिने पोस्ट केलं आहे. तिनं पोस्टमध्ये, आजच्या तरुणींवर टीका करत म्हटलं की, 'मी त्यांना जनरेशन गटर म्हणते, कारण ना त्यांना शिक्षणात रस, ना सौंदर्यात...', असं तिनं म्हटलं. दरम्यान, यानंतर तिची आणखी एक प्रतिक्रिया समोर आली आहे.
अभिनेत्रीने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली, कंगना राणौत म्हणाली, 'हे कशाप्रकारचे विद्यार्थी आहेत. किती अश्लील भाषेचं त्या वापर करतात. उद्या जाऊन सुप्रीम कोर्टातील वकिलांची त्यांना गरज भासली, तर यांच्या आई-वडिलांना ते परवडणार आहे का? यांची स्वतःची तर ती क्षमता (हैसियत) नाहीये परवडण्याची. आता ते आम्हाला ट्रोल करतायेत. 16 वर्षांचे असल्यापासून आम्ही स्वत:चं करिअर घडवत होतो. आई - वडिलांवर कधीही ओझं झालो नाही'.
'आणि यांनी आम्हाला ट्रोल करावे. ज्यांचे आई-वडील अत्यंत विचारसरणीने जुने/कंझर्व्हेटिव्ह आहेत.. आपल्याला माहित आहे की आपला भारतीय समाज कसा आहे, त्यांच्या मुली अशा अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलत आहेत, समाजात त्यांची काय इज्जत उरेल? आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागेल? हे या गोष्टीचा विचार करतात का? एक समाज म्हणून... 'दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे' (हे आपल्याला कोणत्याही प्रकारे मान्य नाही). थँक्यू.", असं कंगना म्हणाली.
आजच्या पिढीतील तरुणींवर टीका करत म्हणाली की, 'मी त्यांना खरंतर जनरेशन गटार असं म्हणते. वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवी जनरेशन आहे. त्यांना शिक्षणात रस ना त्यांना सौंदर्यात रस..त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की, त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाही. ड्रग्ज घेणं, दारु अन् अनैतिक लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधून त्या स्वातंत्र्याचं प्रदर्शन करत असतात', असं कंगना म्हणाली. 'त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसतात. पालकांच्या कमाईवर जगत असतात. जबाबदाऱ्या स्विकारल्याशिवाय स्वातंत्र मिळत नाही', असंही कंगना म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या: