Devendra Fadnavis : मोठी बातमी! CJP च्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
Saam TV July 28, 2026 09:45 PM

महाराष्ट्रात नीट पेपर फुटी प्रकरण समोर आल्या नंतर एकच खळबळ उडाली. याचे पडसाद देशभरात पडल्यानंतर तरुणाईने त्याविरोधात आवाज उठवला. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली ३६ दिवस आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात GEN G नी सरकारपुढे ३ महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या होत्या. त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा. एकीकडे जंतर मंतरवर आंदोलन जोमाने सुरु झाले, तर दुसरीकडे मुंबईत देखील तरुणांनी आंदोलन छेडले. या काळात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तर काही तरुणांवर गुन्हे दाखल केले. मात्र आंदोलन स्थगित झाले असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय हाती घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी मुंबईतही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच अनेक आंदोलनकर्त्या तरुणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.

Health Care : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

दरम्यान, आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असले तरी या प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांवर आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

Health Care : तुम्ही दररोज किती चमचे तेल खाताय? 'ही' मर्यादा ओलांडल्यास वाढू शकतो हृदयविकाराचा धोका

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांनी स्वागत केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी मात्र अद्याप कायम असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.