मुंबई : राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीची जोरदार चर्चा सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, लवकरच तिसरी यादी देखील प्रसिद्ध होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील तब्बल ६ लाख १८ हजार २९९ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मोठा लाभ मिळाला आहे.
या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक लाभ जालना जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार शेतकऱ्यांना मिळाला असून, त्यानंतर परभणी आणि लातूर जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. मात्र, या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) आणि आधार प्रमाणीकरण अत्यंत अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
छत्रपती संभाजीनगर : १६,६६८ शेतकरी
जालना : १,७५,००० शेतकरी
बीड : १७,२२२ शेतकरी
धाराशिव : ५४,०५६ शेतकरी
लातूर : ५४,७३१ शेतकरी
नांदेड : १६,९३० शेतकरी
परभणी : ७१,५५५ शेतकरी
हिंगोली : ४४,१३७ शेतकरी
एकूण लाभार्थी (मराठवाडा) : ६,१८,२९९ शेतकरी
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अधिकृत यादी त्यांनी ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे, त्या संबंधित बँकेच्या शाखेत प्रकाशित करण्यात आली आहे. शेतकरी तेथे जाऊन आपले नाव तपासू शकतात.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांच्या आत आहे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत पैसे भरण्याची गरज नाही, तसेच बँक अधिकारी शेतकऱ्यांना कोणताही त्रास देऊ शकणार नाहीत, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ नाकारला गेला असेल, तर कागदपत्रांमधील त्रुटी हे त्यामागचे कारण असू शकते. २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे.
Next List Announcement : लवकरच जाहीर होणार पुढची यादी
सध्या या योजनेच्या दोन याद्या जाहीर झाल्या असून, लवकरच पुढील याद्या देखील टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील. राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात नक्कीच कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: