Box Office Collection: या आठवड्याच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर मोठे ट्विस्ट येताना दिसत आहेत. विकेंडमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असली, तरी सोमवारपासून चित्रपटांच्या कमाईत किती टिकाव लागतो, यावर त्यांचा पुढील प्रवास अवलंबून असतो. विजय थलपतीचा 'जन नायकन', ख्रिस्टोफर नोलनचा 'द ओडिसी' आणि अजय देवगणचा 'धमाल 4' या चित्रपटांची आतापर्यंतची कमाई जाणून घेऊया...
सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, विजय थलपतीच्या 'जन नायकन'ने प्रदर्शित झाल्यानंतरच्या पाचव्या दिवशी 10.15 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. चित्रपटाची एकूण कमाई 134.90 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विकेंडच्या कमाईपेक्षा बरीच कमी प्रतिसाद मिळाल्याने सोनवारी या सिनेमाच्या कलेक्शला ब्रेक लागला होता . 'जन नायकन'च्या तमिळ आणि तेलुगू आवृत्त्यांबरोबरच हिंदी आवृत्तीनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. एच. विनोद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
ख्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित 'द ओडिसी'ने प्रदर्शित झाल्यानंतरच्या 11व्या दिवशी 3.85 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाची एकूण कमाई 123.50 कोटी रुपये झाली आहे. मॅट डेमन, टॉम हॉलंड आणि ॲन हॅथवे यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'धमाल 4'ने सोमवारी 1.76 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी चित्रपटाच्या खात्यात 7.44 कोटी रुपये जमा झाले होते. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 151.15 कोटी रुपये झाली असून, चित्रपटाने 150 कोटी क्लबमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित या कॉमेडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील प्रवास अद्याप सुरू आहे.