Supreme Court order : सरन्यायाधीशांच्या आदेशामुळे धोक्याची घंटा वाजली! आंदोलन पुन्हा पेटणार? कॉक्रोच जनता पार्टीचा अल्टिमेटम...
Sarkarnama July 29, 2026 01:45 AM

Student protest update : कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांतील विद्यार्थी, तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टाच्या एका अंतरिम आदेशानंतर सीजेपीने संताप व्यक्त केला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास पार्टीने पुन्हा एकदा देशभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर मंगळवारीसीजेपीच्या आंदोलनाशी संबंधित जनहित याचिकांवर सुनावणी झाली. यावर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशामुळे संपूर्ण देशात धोक्याची घंटा वाजली पाहिजे. आधीपासून नोंद असलेल्या एफआयआर कायम ठेवण्याची आणि त्यांचा तपास सुरू ठेवण्याची परवानगी सरकारला देण्यात आली असून ही चिंतेची बाब असल्याचे दास यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने २५ जुलैला युवकांना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात हा आदेश असल्याचे दास म्हणाले आहेत. आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जातील, आंदोलनात शांततेत सहभागी झालेल्या कुणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष केले जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आता केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्ये, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत आंदोलनकर्त्यांविरोधातील एफआयआर कायम ठेवून त्यांचा छळ करतील, असा आरोप दास यांनी केला आहे.

Rahul Gandhi news : राहुल गांधींना तोंडावरच सांगितलं, आश्वासन विसरलात तर तुमच्या विरोधात...! आंदोलकाने भेटीतील चर्चा केली उघड...

सरकारच्या वकिलांनी कोर्टात या अंतरिम आदेशाला कोणताही विरोध केला नाही, ही अधिक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कोर्टाचा हा आदेश आम्हाला अस्वीकार्य आहे. कोर्टाने सरकारला एफआयआर वर कारवाई सुरूच ठेवण्याचा कोणताही सक्तीचा आदेश दिलेला नाही, असा दावा करणे म्हणजे आदेशाचा जाणूनबुजून चुकीचा अर्थ लावण्यासारखे असल्याची नाराजीही दास यांनी व्यक्त केली आहे.

PM मोदींच्या टास्क फोर्समध्ये गोमूत्र तज्ज्ञ! प्रियांका गांधींनी लोकसभेत कुणाची उडविली खिल्ली?

केंद्र सरकारला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीची मुदत आज संपत आहे. आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व एफआयआर मागे न घेतल्यास आणि आश्वासनांची पुर्तता न केल्यास आमच्याकडे देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसेल. शब्द न पाळणाऱ्या सरकारने देशातील युवकांनी शांत राहावे, अशी अपेक्षा ठेवू नये, असा अल्टीमेटम दास यांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.