जळगाव : सरकारी नोकरी नाही, स्वतःच घर नाही,आणि वयस्कर वडील सोबत राहणार असल्याने कौस्तुभ पोद्दार या तरुणाला विवाहासाठी आलेल्या तरुणींनी नाकारल्याने, कौस्तुभ याने गळफास घेऊन आत्महत्या (Jalgaon Crime News) केल्याची घटना जळगाव शहरात घडली होती, या घटनेने समाजात (Jalgaon Crime News) सरकारी नोकरी नसलेल्या आणि स्वतःचे घर नसलेल्या तरुणांच्या पुढे स्वतःचे लग्न जमविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असल्याचं पाहायला मिळत आहे, सध्या समाज व्यवस्थेत मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्याने अनेक तरुणांची विवाह रखडली आहेत, त्यातच मुलींचा शिक्षणाचा दर वाढल्याने, मुलींच्या आपल्या भावी पतीकडूनच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.(Jalgaon Crime News)
तरुणींना आता सरकारी नोकरीत असलेला किंवा चांगला पगार असलेला मुलगा अपेक्षित आहे, त्याचबरोबर त्याच्याकडे शेती स्वतःचे घर असावे, सोबत मुलाचे आई वडील नसावे अशा अपेक्षा, विवाहयोग्य मुलींच्याकडून केल्या जात आहेत. याच अपेक्षांनी मात्र जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात तब्बल 29 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात राहणाऱ्या कौस्तुभ पोद्दार या तरुणाने गळफास घेत गेल्या सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती.(Jalgaon Crime News)
मयत कौस्तुभ हा त्याच्या आई वडिलांच्या सोबत जळगाव शहरात पिंप्राळा परिसरात राहत असे, बी फार्मसीचे शिक्षण घेतल्याच्यानंतर त्याला नाशिक येथे एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती, याच दरम्यान आजाराने त्याच्या आईचे निधन झाले, आईचे निधन झाल्याच्या नंतर घरात महिला असावी म्हणून कौस्तुभ याच्या विवाहाच्या साठी स्थळ शोधणे सुरू केले, मात्र तीन ते चार मुलींच्या कडून त्याला नकार मिळाला होता, कारण एकच त्याला सरकारी नोकरी नाही, स्वतःचे घर नाही, आणि त्याचे वयस्कर वडील कायम सोबत राहणार असल्याचा त्याचा निर्णय, त्याच्या विवाहास अडचणीचा ठरला, एकीकडे आई गेल्याचे दुःख, दुसरीने वयस्क वडील एकटे राहत असल्याचं दुःख आणि आपली परिस्थिती जेमतेम असल्याने, मुलींच्याकडून मिळालेला नकार यातून कौस्तुभ पूर्णपणे खचून गेला, जगण्याचा मार्गच संपल्याचे लक्षात आल्यावर, त्याने सात फेब्रुवारीच्या 26 रोजी, रात्रीच्या वेळेस आपल्या काकाच्या घरात जाऊन गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविली आहे.
कौस्तुभ याने आपले जीवन संपविले असले तरी समाजामध्ये सर्व सामान्य घरातील तरुणांच्या पुढे किती मोठे आव्हान उभे राहिले आहे हे दिसून येत आहे. होमगार्ड म्हणून चाळीस वर्ष सेवा बजावलेल्या त्याच्या वडिलांचा वृध्दवयात एकमेव आधार असलेला एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या पुढे जगावे कसे असा प्रश्न आता उभा राहिला आहे. मयत कौस्तुभ सारखे अनेक तरुण आज कौस्तुभ प्रमाणे आपलं जीवन संपविणार नाही ,यासाठी समाजाने ही आता आपली मानसिकता बदलायला हवी, आपला जावई केवळ सरकारी नोकरीवालाच पाहिजे, स्वतःचे घर बंगला पाहिजे, आई वडील नको अशा अपेक्षा करण्या पेक्षा, सुशिक्षित समजदार आणि दोन्ही कडच्या कुटुंबाला सांभाळ करणाऱ्या तरुणाला पसंती दिली तर ,पुन्हा कोणत्या कौस्तुभ वर जीव गमविण्याचे वेळ येणार नाही, अशी भावना कौस्तुभच्या वडिलांनी आणि काकांनी व्यक्त केली आहे.
विवाह (Marriage) जुळत नसल्याच्या कारणामुळे गेल्या सहा महिन्यांत जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात तब्बल 29 तरुणांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे धक्कादायक वास्तव पोलिसांच्या (Police) विश्लेषणातून समोर आले आहे. ही बाब केवळ आकडेवारी नसून समाजासमोर उभी ठाकलेली गंभीर सामाजिक आणि मानसिक समस्या असल्याचे स्पष्ट होत आहे. जळगाव जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून या सहा महिन्यांच्या कालावधीत 400 हून अधिक स्त्री-पुरुषांनी आयुष्य संपविल्याची नोंद झाली आहे. या सर्व घटनांचे कारणनिहाय विश्लेषण पोलिसांनी केले असून त्यातून समाजाला अंतर्मुख करणारी अनेक कारणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे, विवाह होत नसल्यामुळे 29 तरुणांनी टोकाचा निर्णय घेतल्याची बाब सर्वाधिक चिंतेची मानली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात दररोज सरासरी दोन ते तीन जण आयुष्य संपवत असल्याचे चित्र आहे. कारणे वेगवेगळी असली तरी पुरुषांच्या अशा घटनांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत तब्बल दहापट अधिक असल्याचे विश्लेषणात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 30 जून या कालावधीत 383 पुरुष आणि 8 अल्पवयीन मुलांनी आयुष्य संपविले. त्याच कालावधीत 29 महिला आणि 11 अल्पवयीन मुलींच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
पुरुषांच्या घटनांचे विश्लेषण करताना खालील कारणे समोर आली आहेत.
दारूचे व्यसन – 90
नैराश्य – 74
कौटुंबिक वाद – 64
कर्जबाजारीपणा – 52
आजारपण – 44
विवाह होत नसल्याने – 29
प्रेमभंग – 7
मानसिक तणाव – 6
परीक्षेचा ताण – 6
या आकडेवारीत विवाह जुळत नसल्यामुळे 29 तरुणांनी टोकाचा निर्णय घेतल्याची बाब समाजासाठी मोठा इशारा मानली जात आहे.