Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Marathi July 29, 2026 02:24 PM

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा

केंद्रातील मोदी सरकारच्या आश्वासनानंतर आणि केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र, या आंदोलनानंतरही सरकारकडून अद्यापही आंदोलक विद्यार्थी आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. विद्यार्थ्यांना तुरुंगात ठेवलं जात आहे, चौकशी केली जात आहे. त्यातच, सर्वोच्च न्यायालयानेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना सोडून देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. मात्र, पोलिसांकडून अद्यापही विद्यार्थ्यांना त्रास दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.देशातील काही राज्यात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात आहेत, सरकारकडून पोलिसांमार्फत विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात आहेत, त्रास दिला जात आहे. पोलीसा विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आहेत, अटक करण्याची धमकीही दिली जात आहे. त्यामुळे, सरकारने हे तात्काळ थांबवावं अन्यथा कॉकरोच जनता पार्टी पुन्हा मोठं आंदोलन उभा करेल, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.