Shweta Tiwari Daughter : अभिनेत्री श्वेता तिवारी हिने ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता श्वेता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अशात श्वेता पुन्हा पूर्व पती राजा चौधरी याच्यामुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, राजा याने श्वेता आणि लेक पलक तिवारी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, राजा याने लेक पलक आणि अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
पलक आणि इब्राहिम यांच्या नात्यावर कायम म्हणाला राजा चौधरी?
मुलाखतीत राजा याला पलक आणि इब्राहिम यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. यावर राजा म्हणाला, ‘बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंड असणं फार सामान्य गोष्ट आहे आणि मला काहीही फरक पडत नाही. जर पलक माझ्या आयुष्याचा भाग असती, तर नक्कीच मला फरक पडला असता… पण ती मला बाप मानत नाही. हा प्रश्न तुम्हाला तिच्या आईला विचारायला हवा… तिला फरक पडतो का… मला का फरक पडला पाहिजे? मी तर फक्त बायोलॉजिकल बाप आहे. मला सांगण्यात आलं आहे की, माझं तिच्यासोबत काहीच घेणं – देणं नाही… अशा मी काहीच करु शकत नाही?’
गेल्या 18 वर्षात फक्त 2 – 3 वेळा बोललो… – राजा चौधरी
लेक पलक तिवारी हिच्याबद्दल राजा म्हणाला, ‘पलक आठ वर्षांची होईपर्यंत मीच प्रत्येक दिवशी तिची काळजी घेतली आहे, मात्र गेल्या 18 वर्षांमध्ये मी फक्त तिच्यासोबत 2 – 3 वेळा भेटलो आहे.’, जेव्हा राजाला पलक हिच्या करियरबद्दल आणि सोशल मीडियाबद्दल विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, ‘मला तिचे कोणतेच फोटो आणि व्हिडीओ पाहायचे नाहीत. कारण मी प्रचंड विनविण्या केल्यात अनेकदा स्वतः पुढाकार घेवून बोलण्याचा प्रयत्न केलाय. मला तिची प्रचंड आठवण येते. पण आता मला असं करायचं नाही…’, असं देखील राजा चौधरी म्हणाला.
मी फुकटचा ड्रायव्हर होतो…
राजा चौधरी पुढे म्हणाला, “मी फुकट घरकाम करणारा आणि फक्त फुकटचा ड्रायव्हर होतो. आमच्यात सतत भांडणं व्हायची आणि आम्हाला एकमेकांना समजून घेणं शक्य नव्हते. मी स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यात कोणालाच यश आलं नाही. अखेर आमच्या कुटुंबाची घडी विस्कटली…’, असं देखील राजा मुलाखतीत म्हणाला.