पुण्यातील सोमवार पेठेतील सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर वर्षातून केवळ एकदाच, गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांसाठी खुले केले जाते. या दिवशी तळघरात असलेल्या गोसावी संप्रदायातील गुरूंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागतात. वर्षभर हे तळघर पाण्याने भरलेले असते. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ करून त्यातील पाणी काढले जाते. ज्यामुळे भाविकांना वर्षातून केवळ एकदाच या समाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळते.
त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर
ऐतिहासिक वास्तु, पेशवेकालीन संस्कृती आणि प्राचीन मंदिरांसाठी पुणे शहर ओळखले जाते. याच पुण्यात एक असे मंदिर आहे ज्याची गुढ अचंबित करणारे आहे, ते म्हणजे त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर. भीमवीर गोसावी यांनी इ. स 1754 मध्ये या मंदिराची स्थापना केली. आश्चर्याची बाब म्हणजे हे मंदिर बांधण्यास सुमारे 16 वर्ष लागली. मंदिरातील गणेशाला तीन सोंडा आणि सहा हात आहेत. तसेच श्री गणेश मोरावर विराजमान आहे, म्हणून या गणपतीला त्रिशुंड मयुरेश्वर असे म्हटले जाते.
गुप्त तळघर
मंदिराचे संस्थापक भीमगीर गोसावी आणि त्यांच्या शिष्यांनी यात तळघरात बसून गुप्त साधना केली होती. तसेच येथे गोसावी संप्रदायाच्या महाराजांची समाधी देखील आहे. या तळघरात वर्षभर पाणी साचलेले असते. फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे पाणी बाहेर काढले जाते आणि खुले केले जाते.
गुरुपौर्णिमेलाच का दर्शनासाठी खुले?
गोसावी संप्रदायामध्ये गुरु आणि गुरुपरंपेरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गुरुंच्या समाधींचे दर्शन शिष्यांना आणि भाविकांना घेता यावे, यासाठी तळघर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ते रात्रीपर्यंत खुले ठेवण्यात येते.
हेही वाचा – Guru Purnima 2026 : गुरूपौर्णिमेला आई-वडील आणि गुरुजनांना पाठवा कृतज्ञता व्यक्त करणारे खास मेसेज






