इशान किशनने आयसीसी टी20 क्रमवारीत मोठा कारनामा केला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही विकेटकीपर फलंदाजाला जमलेली नाही. टी20 रँकिंगमध्ये 900हून अधिक रेटिंग पॉइंट मिळवणारा पहिला विकेटकीपर आहे.(Photo: PTI)
इशान किशन आयसीसी टी20 क्रमावारीत अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे त्याचे रेटिंग पॉइंट 916 आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त चार खेळाडूंना 900हून अधिक रेटिंग पॉइंट मिळवता आले आहेत. (Photo: PTI)
इशान किशनने सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांना मागे टाकलं आहे. विराट कोहलीचं टी20 क्रिकेटमधील बेस्ट रेटिंग हे 909 इतकं होतं. तर सूर्यकुमार यादवने 912 रेटिंग पॉइंटपर्यंत मजल मारली होती. आता इशान यांच्या पुढे निघून गेला आहे. (Photo: PTI)
अभिषेक शर्मा टी20 आयसीसी रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग पॉइंट मिळवणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने 931 रेटिंग पॉइंट मिळवले होते. पण आता त्याचा फॉर्म काही खास नाही. त्यामुळे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. (Photo: PTI)
इशान किशनने झिम्बाब्वे दौऱ्यातील तीन टी20 सामन्यात 48.33 च्या सरासरीने 145 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 154 पेक्षा जास्त होता. या मालिकेतील कामगिरीमुळेच त्याचे रेटिंग पॉइंट वाढले आहेत. (Photo: PTI)