शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
राजू सोनावणे July 29, 2026 11:43 PM

मुंबई : राज्य सरकारच्या सहकार विभागाकडून'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान योजने'ची  अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील यादीत 16 लाख 96 हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीमध्ये (Loan Waiver) दोन लाखांपेक्षा कमी रक्कम मिळाल्याची अनेक शेतकऱ्यांची तक्रार समोर आली आहे. यासंदर्भातील हेअर कट (haircut) योजनेबाबत माहिती शासनाच्या सहकार विभागाकडून देण्यात आली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

कर्जमाफीमध्ये दोन लाखांपेक्षा कमी रक्कम मिळाल्याची अनेक शेतकऱ्यांची तक्रार समोर आली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं  आहे आणि अकाउंट एनपीए (NPA) झालेलं आहे, त्याचं शेतकऱ्यांची तक्रार असल्याचा समोर आलं आहे. शेतकऱ्यांना कर्जतून बाहेर काढण्यासाठी haircut योजनेमुळे मोठा दिलासा मिळत असल्याचा दावा सहकार विभागानं केला आहे. 

काय आहे haircut योजना?

महाराष्ट्रात 2020 नंतर  कर्जमाफी झाली नाही  त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज खातं एनपीए खातं झालेल आहे.या एनपीए झालेल्या खात्यांना बाहेर काढण्यासाठी हेअर कट योजना सरकारने सुरू केली. थकित कर्ज असेल तर बँकांशी तडजोड करून पूर्णपणे शेतकऱ्यांचं खातं निरंक केलं जातं त्याचे वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत.या टक्केवारी प्रमाणे कर्जमाफीची रक्कम बॅंकेत भरुन खाती निरंक केली जात आहेत.


काय आहेत टप्पे...


शेतक-यांचं 30 सप्टेंबर 2021 किंवा त्यापूर्वीचा कर्ज असेल तर बँकेत एकूण कर्जाच्या  35 टक्के रक्कम भरून कर्ज निरंक करता येईल.


1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कर्ज घेतलं असेल तर 45 टक्के कर्ज भरून खातं निरंक करता येईल.


1 ऑक्टोबर  2022 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कर्ज घेतलं असेल 55 टक्के रक्कम भरुन कर्ज खातं निरंक  करता येईल.


1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत कर्ज घेतले असेल तर 70 टक्के कर्ज भरुन कर्ज खातं निरंक करता येईल. 


1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज घेतल असेल तर 85 टक्के रक्कम भरून कर्ज खातं निरंक  करता येईल


त्यामुळे एनपीए झालेली खाती निरंक करण्यासाठी कर्जमाफी योजनेतील रक्कम त्या प्रमाणात दिली असताना ही रक्कम कमी जास्त होऊ शकते. उदाहरणार्थ जर एक लाखाचं कर्ज थकीत असेल तर या टक्केवारीत भरून थकबाकी निरंक करता येऊ शकते.

31 मार्च 2026 पर्यंतच्या थकबाकीचा प्रश्न निकाली

व्यावसायिक बँकांमधील (Commercial Banks) थकीत कर्जाबाबत (NPA खाती) शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असू नये, यासाठी सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले की, 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीची रक्कम पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तारखेनंतरच्या व्याजाचा भार संबंधित बँकांनी उचलण्याची जबाबदारी घेतली असल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.