नवी दिल्ली: राष्ट्रीय सन्मान अपमान विरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आज केंद्र सरकारने राज्यसभेत मंजूर करून घेतले. वंदे मातरम् राष्ट्रीय गीताचा अपमान रोखण्याच्या दृष्टीने हे विधेयक आणले होते. वंदे मातरम् गीताचा अपमान केल्यास दोषींना तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा तसेच दंडाच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढकेंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर दिले. तत्पूर्वी काँग्रेससह इतर विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला. वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सरकारी कार्यक्रमांमध्ये हे गीत गाणे आवश्यक करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर विधेयकावरील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ‘‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून ते स्वातंत्र्य लढाई, राष्ट्रीय अस्मिता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या गीताचा अपमान सहन केला जाणार नाही,’’ असे नित्यानंद राय यांनी सांगितले.
‘वंदे मातरम्’ हे आधीपासून देशवासीयांच्या भावनांशी जोडले गेलेले गीत असल्याने त्याच्या सन्मानासाठी वेगळा कायदा करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद विरोधी पक्षांकडून करण्यात आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्यासाठी किंवा राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सदर कायद्याचा वापर केला जाऊ शकतो, असे मत काही विरोधी सदस्यांनी मांडले. जन गण मन राष्ट्रगीतात व्यत्यय आणणे किंवा त्याचा अपमान करणाऱ्यांना सध्याचा कायदा लागू होतो. मात्र विधेयक मंजूर झाल्यामुळे या कायद्याच्या कलम तीनची व्याप्ती वाढणार आहे.
NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेप विरोधकांचा सभात्यागआंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावे, अशी मागणी करत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी चर्चेवेळी प्रचंड गदारोळ घातला. उपसभापती हरिवंश यांनी समज देऊनही विरोधक शांत झाले नाहीत. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.