Uttarakhand Health Tourism: उत्तराखंड बनणार हेल्थ टूरिझमचे जागतिक केंद्र! हॉटेल्स, रेस्टॉरंट्स अन् धर्मशाळांमध्ये सुरू होणार आयुष आरोग्य केंद्र
esakal July 30, 2026 03:45 PM

उत्तराखंडला आयुर्वेद आणि वेलनेस टूरिझमचे मोठे केंद्र बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पर्यटकांना पर्यटनासोबतच आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्माचा लाभ मिळावा, यासाठी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धर्मशाळांमध्ये आयुष आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ

आयुष मंत्री मदन कौशिक यांनी आयुष विभाग आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (QCI) अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा केली. या केंद्रांमुळे उत्तराखंडात येणाऱ्या पर्यटकांना प्रवासादरम्यानच आयुर्वेद, योग आणि पंचकर्माच्या सुविधा मिळू शकतील.

पर्यटनासोबत आरोग्यसेवेची जोड

उत्तराखंड हे आयुर्वेद आणि योगासाठी प्रसिद्ध आहे. हरिद्वार आणि ऋषिकेश यापूर्वीच जगभरातील पर्यटकांसाठी वेलनेस टूरिझमची महत्त्वाची ठिकाणे बनली आहेत. आता ही सुविधा राज्यातील इतर पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धर्मशाळांमध्ये आयुष केंद्रे सुरू झाल्यास पर्यटकांना वेगळे आरोग्य केंद्र शोधण्याची गरज भासणार नाही. मुक्कामाच्या ठिकाणीच त्यांना आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म आणि इतर आरोग्यविषयक सुविधा मिळू शकतील.

या केंद्रांसाठी आवश्यक मानके निश्चित केली जात आहेत. केंद्र सरकारसोबत समन्वय साधून या योजनेसाठी आवश्यक निधी आणि मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

१४८ आयुष्मान आरोग्य मंदिरे मानकांवर उतरली

उत्तराखंडातील १४८ आयुष्मान आरोग्य मंदिरे राष्ट्रीय ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) च्या निर्धारित मानकांवर खरी उतरली आहेत. त्यामुळे राज्यात दर्जेदार आयुष सेवा देण्यासाठी आधीच मजबूत व्यवस्था तयार झाली आहे.

पंचकर्म केंद्रांची संख्या वाढवण्यावर भर

उत्तराखंडमध्ये सध्या ४६ पंचकर्म केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमधील सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी आयुष डॉक्टर आणि पंचकर्म तंत्रज्ञांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पंचकर्माच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्यामुळे देशभरातून तसेच परदेशातून उत्तराखंडात येणाऱ्या पर्यटकांना मोठा फायदा होऊ शकतो.

NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेप औषधी वनस्पतींचीही मोठी ताकद

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात अनेक दुर्मीळ आणि औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. ही नैसर्गिक संपत्ती राज्याला आयुर्वेद आणि वेलनेस टूरिझमचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सरकारच्या या प्रयत्नांमुळे उत्तराखंडात येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणासोबत आयुर्वेद, पंचकर्म आणि योगाचा अनुभव एकाच ठिकाणी घेता येणार आहे. पर्यटन आणि आरोग्यसेवेची ही जोड राज्याच्या वेलनेस टूरिझमला नवी दिशा देऊ शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.