Ravi Kishan Fitness: इंजेक्शनशिवाय 57 व्या वर्षी 18 किलो वजन केलं कमी! रवी किशनने सांगितला डाएट प्लॅन आणि फिटनेस फॉर्म्युला
esakal July 30, 2026 09:45 PM

RAVI KISHAN DIET PLAN FOR WEIGHT LOSS: वजन कमी करण्यासाठी महागडी औषधे किंवा इंजेक्शन्सच गरजेची असतात, असा समज अनेकांचा आहे. मात्र, अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनी हा समज खोटा ठरवला आहे. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी कोणतीही वजन कमी करणारी औषधे न घेता तब्बल 18 किलो वजन घटवले. 90 किलोवरून 72 किलोपर्यंतचा त्यांचा हा फिटनेस प्रवास नेमका कसा होता? जाणून घेऊया त्यांच्या आहारातील बदल आणि रोजच्या फिटनेस रुटीनबद्दल.

90 किलोवरून 72 किलोपर्यंतचा प्रवास

हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार रवी किशन म्हणाला, "माझं वजन 90 किलो झालं होतं. आता ते 72 किलोवर मी आणलंय. मी सध्या शरीर अधिक फिट आणि लीन करण्यासाठी मेहनत घेत आहे."

त्याने सांगितलं की, खासदार म्हणून गोरखपूर मतदारसंघात सतत दौरे, बैठका आणि व्यस्त दिनक्रमामुळे त्याचं वजन वाढलं होतं. पण, आहारात बदल करून त्याने पुन्हा वजन नियंत्रणात आणलंय.

१३२ किलोवरून थेट ६५ किलोवर! फू बाई फू फेम आरती सोलंकीनं पाणी पुरी खाऊन बदलल्या 'या' सवयी आहारात केले महत्त्वाचे बदल

रवी किशनच्या मते, वजन कमी करण्यामध्ये 70 ते 80 टक्के भूमिका आहाराची असते, तर बाकी 20 ते 30 टक्के भूमिका व्यायामाची असते.

तो म्हणाला, "वयाच्या पन्नाशीनंतर वजन कमी करणं सोपं नसतं. पण योग्य आहार घेतला तर ते शक्य आहे."

एक वेळचे जेवण, इंटरमिटंट फास्टिंग आणि फळांचा समावेश

रवी किशनने सांगितलं की तो काय नेहमी फक्त फळांवरच राहत नाही. कामाच्या स्वरूपानुसार तो आहारात बदल करतो.

सध्या संसद अधिवेशन सुरू असल्याने तो भिजवलेले सुकेमेवे, सॅलड, तसंच गरजेनुसार प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि तूप याचापण आहारात समावेश करतो.

त्यांच्या आवडीच्या फळांमध्ये:

  • अवोकॅडो

  • किवी

  • सफरचंद

  • केळी

  • संत्री

  • ताज्या फळांचा ज्यूस

रामाच्या भूमिकेसाठी रणबीरने केला योग, ध्यान आणि धर्मग्रंथाचा अभ्यास; रामायणासाठी जाणून घेतलं प्रभू श्रीरामांचं तत्वज्ञान नियमित व्यायामही तितकाच महत्त्वाचा

रवी किशन म्हणाला, "तुमचं वजन वाढलं आहे की कमी झालं, हे समजण्यासाठी पँटची कंबरच पुरेशी असते. ती लगेच फरक दाखवते. पण, फक्त खाण्यावर नियंत्रण ठेवून चालत नाही. शरीर तंदुरुस्त आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी रोज थोडाफार व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे."

चित्रपटांसाठीही बदलला लूक

रवी किशनने सांगितलं की, वेगवेगळ्या भूमिकांसाठी त्याला शरीरयष्टीत बदल करावा लागतो. 'लापता लेडीज' चित्रपटासाठी त्याला जाड दिसायचं होतं, तर 'मिर्झापूर: द मूव्ही' आणि 'नागझिला' साठी त्याला अजूनच फिट आणि सडपातळ शरीरयष्टी तयार केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.