समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लुटमार; बुलढाण्यातून पाच जणांच्या टोळीला अटक
Saam TV July 30, 2026 10:45 PM
  • बुलढाणा जिल्ह्यातून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

  • प्रवाशांना तलवार आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटायचे

मनोज जैस्वाल, साम प्रतिनिधी

वाशिमच्या कारंजा हद्दीतील समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लुटमार करणाऱ्या टोळीला बुलढाण्यातून अटक करण्यात आलीय. प्रवाशांना तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून लूटलं जातंय. लुटमार करणाऱ्या या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांना यश मिळवले आहे. या कारवाईत बुलढाणा जिल्ह्यातून पाच आरोपींना अटक करण्यात आली.

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

पोलिसांनीआरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, दोन बनावट पिस्तुले, लोखंडी रॉड, पाच मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन हे दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरून रायपूरकडे जात होते. पहाटे तीनच्या सुमारास कारंजा लाड परिसरात थकवा आल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून विश्रांती घेतली.

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

त्याचवेळी चार आरोपींनीतलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील 5 हजार रुपये रोख व दोन ग्रॅम सोन्याचे कानातले असा सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लुटून पलायन केले. स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे हर्षद पांडुरंग साबळे याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून चेतन संजय माने, ओम सुरेश सपकाळ, धनंजय उजालसिंग कमळीकर आणि गोपाल श्रीकिसन मोरे या साथीदारांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना अटक केली.

आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम, हुंडाई व्हर्ना कार, गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.