मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्याकडे वाहून येणाऱ्या कचऱ्यासाठी यांत्रिक जाळी प्रणाली (बँक-फ्रंट बार स्क्रीन) चा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. समुद्रात जाणाऱ्या कचऱ्याला प्रतिबंध करण्यासाठी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
घनकचरा व तरंगता कचरा रोखण्यासाठी यांत्रिक जाळी प्रणालीचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश महापालिकाआयुक्त अश्विनी भिडे यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याला पावसाळ्यापूर्वी दिले होते.
Mumbai News: आरामदायी गाड्यांवर महापालिकेची उधळपट्टी! पदाधिकाऱ्यांवरील २ कोटी १६ लाखांचा खर्च वाया, नव्या गाड्या सहा महिन्यांत आवडेनाशापावसाळ्याच्या दिवसात उदंचन केंद्रातील यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सध्या दुसऱ्या टप्प्यात पावसाचा जोर कमी असला तरी मुंबईतअजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणी उपसा संच कार्यरत राहतील, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
पूरस्थितीपासून दिलासापावसाळ्यात पाणी भरल्यास कचरा तसेच तरंगता कचरा समुद्रात मोठ्या प्रमाणात वाहून जातो. त्यामुळे पर्यावरणाला थोका निर्माण होतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी जुहू येथील इर्ला पर्जन्य जल उदंचन केंद्र हे पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावे, जेणेकरून मिलन भुयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक तसेच जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थितीपासून दिलासा मिळेल. त्यासाठी जुहू किनाऱ्याकडे वाहून जाणारा घनकचरा व तरंगता कचरा रोखण्यासाठी यांत्रिक जाळी प्रणालीचा प्रभावी वापर करावा, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
Mumbai News: 'बाबरी' पाडली जाऊ नये म्हणणे देशद्रोह नव्हे, मुंबई पोलिसांचा तडीपारीचा आदेश रद्द; हायकोर्टाचे निरीक्षण