बदलते वातावरण, प्रदूषण आणि टाळूची योग्य काळजी न घेतल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते या समस्येवर ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) अत्यंत प्रभावी मानले जाते. हे टाळूची पीएच पातळी नियंत्रित ठेवून फंगल इन्फेक्शन आणि डेड स्किन सेल्स दूर करण्यास मदत करते. ऍपल सायडर व्हिनेगरचा योग्य वापर कसा करावा आणि याशिवाय दही, कडुलिंब व मेथीच्या दाण्यांसारख्या घरातील वस्तूंचा वापर करून कोंड्याची समस्या कशी दूर करता येईल याविषयी जाणून घेऊयात. apple cider vinegar is remedy for dandruff
ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर म्हणजेच ऍपल व्हिनेगर. त्वचारोगतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऍपल सायडर व्हिनेगर टाळूचा पीएच नियंत्रित करते, डोक्यातील कोंडा निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून टाकते आणि टाळूवरील मृत त्वचेच्या पेशी अर्थात डेड स्किन सेल्स काढून टाकते. ऍपल सायडर व्हिनेगर केसात असलेले फंगल इन्फेक्शनही काढून टाकते आणि टाळूला निरोगी ठेवते.
कसे वापराल?
डोक्यावर ऍपल सायडर व्हिनेगर लावण्यासाठी एका भांड्यात 1 चमचा व्हिनेगर घ्या आणि त्यात दुप्पट पाणी मिसळा. जर तुम्ही 2 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर घेत असाल तर त्यात 4 चमचे पाणी भरा आणि ते टाळूवर लावा आणि 5 मिनिटांकरता केसांना याचा मसाज करा. आता तुमचे डोके धुवा आणि स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पाहिल्यास काही दिवसांतच तुम्हाला कोंड्यापासून आराम मिळेल.
पुढिल उपायही करता येतील –
- दही देखील कोंडा दूर करण्यात प्रभावी आहे. डोक्यावर साधे दही किंवा त्यात लिंबाचा रस मिसळून लावा आणि 10 मिनिटांनी डोके धुवा. कोंडा कमी करण्यात हा प्रभावी उपाय आहे.
- कडुलिंबाचा रस देखील टाळूची त्वचा चांगली स्वच्छ करतो. कडुलिंबाची पाने बारीक करून आणि पिळून कडुलिंबाचा रस काढला जातो. ते डोक्यावर लावा आणि 45 ते 50 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.
- मेथीचे दाणे भिजवून, कुस्करून डोक्यावर लावल्यास डोक्यातील कोंडा दूर होण्यास मदत होते. मेथीचे दाणे केवळ कोंडाच दूर करत नाहीत तर केस गळणे देखील कमी करतात.
हेही वाचा – तुमच्या केसांसाठी योग्य कंगवा कोणता ?





